NOTES google
अर्थविश्व

रवींद्रनाथ टागोर, अब्दुल कलाम यांचाही फोटो भारतीय नोटांवर दिसू शकतो....

मिळालेल्या माहितीनुसार, ते अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या आरबीआय आणि सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला पाठवण्यात आले आहे.

दिपाली सुसर

मुंबई : आता तुम्हाला रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांचाही फोटो भारतीय नोटांवर दिसू शकतो. या दोन्ही व्यक्तीचे फोटो नोटांवर आणायचा आरबीआय विचार करत आहे.

भारताचे राष्ट्रगीत लिहणारे बंगालचे महान व्यक्तिमहत्व असलेले रवींद्रनाथ टागोर आणि भारताचे 11 वे राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ एपीजे अब्दुल कलाम या दोन्ही महापुरुषांचे फोटो आता आपल्याला भारतीय चलनी नोटावर महात्मा गांधींसोबत दिसू शकतात.

या आधी सर्व भारतीय चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वॉटरमार्क कोरण्यात आला आहे.

अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) एपीजे अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टागोर वॉटरमार्कचा वापर बँक नोटांच्या श्रेणीवर करण्याचा विचार करत आहेत.

विशेष म्हणजे की, आरबीआय(RBI) पहिल्यांदाच नोटांवर महात्मा गांधींव्यतिरिक्त इतर महापुरुषांचा फोटो वापरण्याचा विचार करत आहे.

IIT दिल्लीचे एमेरिटस प्रोफेसर दिलीप शहानी यांनी महात्मा गांधी, एपीजे अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या वॉटरमार्क नमुन्यांचे दोन वेगवेगळे संच निवडून सरकारच्या अंतिम विचारासाठी सादर करण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ते अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या आरबीआय आणि सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला पाठवण्यात आले आहे.

प्रोफेसर शहा हे वॉटरमार्क शोधणे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये अत्यंत हुशार आणि माहिर आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये त्यांना सरकारने पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.

सरकारी सूत्रांनुसार,सन 2017 मध्ये, नोटांच्या नवीन मालिकेसाठी सुरक्षा वैशिष्ट्ये पाहण्यासाठी आरबीआयच्या नऊ अंतर्गत समित्यांपैकी एक समिती स्थापन करण्यात आली होती.

त्यांनी सन 2020 मध्ये त्यांचा अहवाल सादर केला आहे.ज्यामध्ये गांधींव्यतिरिक्त टागोर आणि कलाम यांनाही वॉटरमार्क असल्याचे म्हटले आहे.

2000 रुपयांच्या नोटा वगळता इतर सर्व नोटांमध्ये याचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र तिघांचेही वॉटरमार्क नमुने मंजूर झाले आहेत. सरकार पातळीवर यावर विचार चालु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT