RBI sakal
अर्थविश्व

RBI: दहशतवाद्यांच्या खात्यांची माहिती द्या; RBI ने दिल्या ‘या’ बँकांना सूचना

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी वित्तीय संस्थांना आणि बँकांना गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केलेल्या दहा व्यक्तींच्या खात्यांबद्दल माहिती देण्यास सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी वित्तीय संस्थांना आणि बँकांना गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केलेल्या दहा व्यक्तींच्या खात्यांबद्दल माहिती देण्यास सांगितले.

गृह मंत्रालयाने 4 ऑक्टोबर रोजी हिजबुल मुजाहिदीन (HM), लष्कर-ए-तैयबा (LET) आणि इतर प्रतिबंधित संघटनांच्या एकूण दहा सदस्यांना यूएपीए (UAPA) अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले होते.

ज्यांना सरकारने दहशतवादी घोषित केले आहे त्यामध्ये हबीबुल्ला मलिक उर्फ साजिद जट (पाकिस्तानी नागरिक), बासित अहमद रेशी (जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि सध्या पाकिस्तानात), इम्तियाज अहमद कंडू उर्फ सज्जाद (जम्मू-काश्मीर के सोपोर आणि सध्या पाकिस्तानात), जफर इकबाल उर्फ सलीम (पूंछ आणि सध्या पाकिस्तानात) आणि शेख जमील-उर-रेहमान उर्फ शेख साहब (पुलवामा) यांचा समावेश आहे.

आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनांची कायद्याच्या अधीन राहून अंमलबजावणी करावी’.

या सुचनेमध्ये मध्ये बँका, अखिल भारतीय वित्तीय संस्था (एक्झिम बँक, नाबार्ड, एनएचबी (NHB) सिडबी (SIDBI) आणि एनएबीएफआईडी (NABFID) आणि एनबीएफसी (NBFC) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT