RBI-bank
RBI-bank 
अर्थविश्व

सहकारी बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - सहकारी बॅंकांवर नियंत्रणाची रिझर्व्ह बॅंकेला मुभा देणाऱ्या बॅंकिंग नियमन कायद्यातील दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. यामुळे देशभरातील दीड हजाराहून अधिक सहकारी बॅंकांचे नियंत्रण रिझर्व्ह बॅंक करू शकेल. सहकारी बॅंकांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही दुरुस्ती केल्याचा सरकारचा दावा आहे. 

मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र बॅंकेतील गैरव्यवहाराच्या पार्श्‍वभूमीवर सहकारी बॅंकांवरही रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण असावे, या मागणीने जोर धरला होता. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बॅंकिंग नियमन कायद्यामधील दुरुस्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामुळे विविध राज्यांमध्ये असलेल्या सहकारी बॅंकांच्या कारभारावर आता रिझर्व्ह बॅंकेला लक्ष ठेवता येईल. बॅंकांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी तसेच कारभाराचे नियमन करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

देखरेख आणि लेखापरीक्षणाचे अधिकार
सद्यस्थितीत देशात १ हजार ५४० सहकारी बॅंका असून, त्यात सुमारे ८.६ कोटी खातेधारक, या बॅंकांमध्ये ठेवीदारांचे तब्बल पाच लाख कोटी रुपये जमा आहेत. कायदा दुरुस्तीनंतर या सहकारी बॅंकांच्या व्यवहारांवर देखरेखीचे आणि लेखापरीक्षणाचे अधिकार रिझर्व्ह बॅंकेकडे येतील. मात्र, या बॅंकांचे प्रशासकीय व्यवस्थापन सहकारी निबंधकांमार्फत हाताळले जाईल, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.  

नियम पाळावे लागतील
या संशोधनानुसार बॅंकेत व्यवस्थापकीय पातळीवरील नियुक्‍त्या करताना रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नेमताना रिझर्व्ह बॅंकेची परवानगीदेखील बंधनकारक असेल. मागील पाच वर्षांमध्ये नागरी सहकारी बॅंकांमध्ये हजारांहून अधिक गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस येऊन ठेवीदारांचे तब्बल २२० कोटी रुपये बुडाल्यात जमा असल्याने ही कायदादुरुस्ती आवश्‍यक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ही कायदादुरुस्ती सहकारी बॅंकांमधील ठेवीदारांचे संरक्षण करणारी आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. सहकारी बॅंकांचे यापुढे लेखापरीक्षण होईल आणि कर्जमाफीच्या नियमांचे पालनही या बॅंकांना काटेकोरपणे करावे लागेल, असे पासवान यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT