RBI cuts repo rate by 25 basis points 
अर्थविश्व

ग्राहकांना दिलासा: रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा दर कपात

वृत्तसंस्था

मुंबई: रिझर्व्ह बँकेने आज (शुक्रवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 5.40 टक्क्यांवरून कमी होत 5.15 टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली  रिझर्व्ह बँकेने आज आपले द्विमाही पतधोरण जाहीर केले आहे.

रेपो दर म्हणजेच बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर लागणारा व्याज दर. यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज दरात घट होत असल्याने त्याचा फायदा बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. आता कर्जदर कमी झाल्याने गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची (MPC) बैठक मंगळवारपासून सुरु आहे.  बाजार विश्लेषक आणि  तज्ज्ञांकडून किमान पाव टक्का दर कपात होण्याची अपेक्षा आधीपासूनच व्यक्त करण्यात येत होती. ही सलग पाचवी दर कपात करण्यात आली आहे. 

जानेवारी 2019 पासून रिझर्व्ह बँकेकडून सलग चार वेळा रेपो दरात कपात करण्यात आली आहे. गेल्या चार पतधोरणात आतापर्यंत रेपो दरात १.१० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. मंदावलेली अर्थव्यवस्था, घटलेला विकास दर आणि एनबीएफसीमधील गैरव्यवहारांमुळे लिक्विडीटी घटल्याने रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपातीची शक्यता आधीपासून व्यक्त करण्यात येत होती.

रेपो दर म्हणजे काय? 
रेपो दर म्हणजे ज्या दराने बॅंका रिझर्व बॅंकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेतात तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बॅंकांना रिझर्व बॅंकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं;तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बॅंकेला स्वस्तात कर्ज मिळणं. म्हणजेच रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बॅंकांना ग्राहकांना द्यावयाच्या कर्जांचे दरही वाढवावे लागतात;तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? 
रिव्हर्स रेपो दर म्हणजे रेपो दराच्या अगदी उलट संकल्पना. बॅंका त्यांच्याकडील जास्तीचा निधी ठेवींच्या रूपात रिझर्व बॅंकेकडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बॅंक बॅंकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

Satara fraud:'बहुलेतील एकाची १३ लाखांची फसवणूक'; बनावट कागदपत्रांद्वारे माेटारीची विक्री, सहा जणांवर गुन्हा

Nagpur Crime: नागपुरात कचरा गाडी चालकाचा खून, जुन्या वादातून घडली घटना...

SCROLL FOR NEXT