RBI Increased Repo Rate esakal
अर्थविश्व

RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट वाढवला; गृहकर्ज, वाहन कर्ज महागणार

RBI Increased Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपलं पतधोरण जाहीर केलं असून त्यानुसार रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपलं पतधोरण जाहीर केलं असून त्यानुसार रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. हा रेपो रेट ०.२५ बेसिस पॉईंटनं वाढवण्यात आला आहे. त्यामुळं होमलोन महागणार आहेत.

यामुळं बेरोजगारी आणि महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. (RBI Governor Shaktikanta Das announces that RBI increases the repo rate by 25 basis)

गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी रेपो रेटमध्ये ०.२५ बेसिस पॉईंटनं वाढ केली आहे, त्यामुळं तो आता ६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे.

रेपो रेटबाबत महत्वाच्या घोषणाही होण्याची शक्यता आहे. यापूर्वी तीन दिवस आरबीआयच्या एमपीसीची महत्वाची बैठक पार पडली. यानंतर बैठकीत काय चर्चा झाली तसेच यावेळी काय निर्णय घेतले गेले याची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत दिली.

होमलोन वाढणार

रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये वाढ केल्यानं होमलोनच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. मे २०२२ मध्ये जेव्हा ४ टक्के रेपो रेट होता त्यात आता वाढ होऊन ६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

यावर गव्हर्नर म्हणाले, गेल्या तीन वर्षात जागतीक अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामानुसार जगभरातील मध्यवर्ती बँकांना व्याजदार वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. महागाईवर नियंत्रणासाठी हे कठीण निर्णय घेणं क्रमपात्र आहे.

जागतीक मंदीचं वातावरण आता गंभीर नाही

गव्हर्नर दास म्हणाले, जागतीक मंदीची स्थिती आता तितकी गंभीर दिसत नाहीए जितकी काही महिन्यांपूर्वी होती. जगतील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या विकासाच्या शक्यतांमध्ये सुधारणा झाली आहे.

त्यामुळं चलनवाढीत घट झाली आहे. त्याचबरोबर या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत महागाईचा दर ५.६ टक्के राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT