RBI Governor Shaktikanta Das
RBI Governor Shaktikanta Das Sakal Photo
अर्थविश्व

'RBI'चं पतधोरण जाहीर, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे निर्णय

सकाळ डिजिटल टीम

जगभरात ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत RBI ने आज पॉलिसी रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पॉलिसी रेट पूर्वीप्रमाणेच 4% वर कायम आहे. सध्याच्या परिस्थितीत, बाजार तज्ञांनी आधीच अपेक्षा केली होती की आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास मागील वेळेप्रमाणे पॉलिसी रेटमध्ये कोणताही बदल करणार नाहीत. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास (Governor Shaktikanta Das) यांनी रेपो दर (Repo Rate) 4% वर ठेवताना अर्थव्यवस्थेसाठी 'सर्वसमावेशक' दृष्टीकोन ठेवला आहे. (RBI Monetary Policy Update in Marathi)

याशिवाय आरबीआयने रिव्हर्स रेपो दरही (Reverse Repo Rate) पूर्वीच्या स्तरावर म्हणजेच 3.35% ठेवला आहे. चलनविषयक धोरण समितीच्या 6 सदस्यांपैकी 5 सदस्यांनी धोरण दर सध्याच्या पातळीवर ठेवण्यास पाठिंबा दिला होता. शक्तीकांत दास म्हणाले की, स्थायी सुविधा देखील पूर्वीप्रमाणे 4.25% आहे. RBI ने 2021-22 साठी CPI महागाईचा अंदाज 5.3% वर कायम ठेवला आहे.

ओमिक्रॉनचा सामना करण्यास तयार

शक्तीकांत दास म्हणाले की जागतिक स्पीलओव्हर व्यवस्थापित करण्यासाठी आमच्याकडे अनुकूल कालावधी आहे. (economic buffer) त्याचप्रमाणे महागाईचं उद्दिष्ट्य गाठण्यासाठी अर्थव्यवस्था सक्षम आहे. आम्ही COIVD-19 चा सामना करण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार आहोत, असं गव्हर्नर म्हणाले.

रब्बी हंगामातून अपेक्षा

किंमतीचा दबाव आत्ताच्या कालावधीत कायम राहू शकतो. रब्बी पिकांचं चांगल्या उत्पन्नाची शक्यता लक्षात घेऊन हिवाळ्याच्या आगमनाने यात भर पडणार असल्याचं शक्तीकांत दास म्हणाले. तसेच भाज्यांच्या किंमतीत या हंगामात सुधारणा अपेक्षित आहेत, असं ते म्हणाले.

जीडीपीचा अंदाज 9.5 %

वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज 9.5% इतका कायम आहे. RBI ने आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी GDP वाढीचा अंदाज पूर्वीच्या 6.8% वरून 6.6% पर्यंत कमी केला आहे. यासह, आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीसाठी GDP अंदाज 6.1% वरून 6% पर्यंत कमी केला आहे. शक्तीकांत दास म्हणाले की, आरबीआयने आर्थिक वर्ष 2022 साठी किरकोळ चलनवाढीचे लक्ष्य 5.3% राखून ठेवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT