RBI Google file photo
अर्थविश्व

RBI कडून महत्त्वाच्या व्याजदरात कोणताही बदल नाही

आरबीआयच्या आर्थिक धोरण समितीने रेपो रेटमध्ये (Repo rate) कोणताही बदल न करता ४ टक्के रेपो रेट कायम ठेवला आहे.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: आरबीआयने (RBI) शुक्रवारी महत्त्वाच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयच्या आर्थिक धोरण समितीने रेपो रेटमध्ये (Repo rate) कोणताही बदल न करता ४ टक्के रेपो रेट कायम ठेवला आहे. त्याचवेळी रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के कायम आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने व्याजदरात कोणतेही बदल केलेले नाहीत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या परिणामातून अर्थव्यवस्था सावरेपर्यंत व्याजदर कमी ठेवणार असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. सध्या देश चांगल्या स्थितीमध्ये असून अनेक आर्थिक निर्देशांकांमध्ये प्रगती झाल्याचे दास यांनी सांगितले. "आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. ४ टक्के रेपो रेट कायम ठेवला. अर्थव्यवस्थेतील अस्वस्थतता कमी करणं आणि विकासाला चालना देणं हा त्यामागे उद्देश आहे'' असे शक्तीकांत दास म्हणाले.

चांगला पाऊस आणि आर्थिक निर्देशांकांमध्ये झालेली सुधारणा यामुळे भविष्यात आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे शक्तीकांत दास म्हणाले. सलग सातव्या तिमाहीत आरबीआयने महत्त्वाच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT