RBI Monetary Policy sakal
अर्थविश्व

RBI monetary policy: रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर; आर्थिक वाढ, महागाई, GDP किती राहील जाणून घ्या

गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या वर्षातील पहिलं पतधोरण जाहीर केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपलं पतधोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार २०२३-२४ आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत महागाईचा दर ५.६ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

जीडीपी वाढीचा दर 'इतका' राहील

पतधोरण समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आर्थिक वाढ, जीडीपी आणि महागाई यावर भाष्य केलं. दास म्हणाले, जीडीपी वाढीचा दर हा ६.४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यांपैकी पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के तिसऱ्या तिमाहीत ६ टक्के तर चौथ्या तिमाहीत ५.८ टक्के राहिल असंही त्यांनी म्हटलं आहे.

महागाईचा दर 'इतका' राहील

तर यंदाच्या २०२३-२४ च्या आर्थिक वर्षात महागाई ६.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर यंदा पाऊस सर्वसामान्य राहिला तर सीपीआय महागाई ५.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे, असंही दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

रेपो रेटमध्ये वाढ

दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ करण्यात आली असून त्यामुळं हा रेट ६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळं सर्व मोठ्या कर्जांचे हप्ते महागणार आहेत. यामध्ये गृहकर्ज, वाहन कर्ज यांचा समावेश आहे. त्याचबरोबर ठेवींवरील व्याजदरातही वाढ होईल त्यामुळं हा छोटासा दिलासाही असेल, असं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT