RBI 
अर्थविश्व

RBI Monetary Policy: व्याज दरांमध्ये कसलाही बदल नाही; रेपो रेट 4 टक्केच राहणार

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मॉनेटरी पॉलिसी एप्रिल 2021 ची घोषणा केली आहे. या घोषणेचं खास वैशिष्ट्य म्हणजे व्याज दरांमध्ये कसल्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाहीये. रेपो रेट आणि रिवर्स रेपो रेटच्या दरांमध्ये कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाहीये. RBI चं म्हणणं आहे की कोरोनामुळे अर्थव्यवस्थेच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या मॉनेटरी पॉलिसीमध्ये व्याज दरांमध्ये कसल्याही प्रकारचे बदल केलेले नाहीयेत. मॉनेटरी पॉलिसीमध्ये रेपो रेटला 4 टक्क्यांवरच स्थिर ठेवलं गेलं आहे. रिवर्स रेपो रेटमध्ये देखील कसल्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाहीये. तो आहेत तसाच 3.5 टक्क्यांवर राहणार आहे.  जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत ही अनुकूल भूमिका राहिल. आता सलग पाचव्यांदा पॉलिसीचे दर बदललेले नाहीयेत. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज 7 एप्रिल रोजी मॉनेटरी पॉलिसीची घोषणा केली आहे. 

याआधी देखील फेब्रुवारीमध्ये व्याज दरांमध्ये कसल्याही प्रकारचा बदल झाला नव्हता. तज्ज्ञांना असं वाटत होतं की, कोरोना व्हायरसच्या  प्रकरणांमधील वाढीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे, RBI कडून मॉनेटरी पॉलिसीमध्ये यथास्थिती राहण्याची आशा आहे. 

सध्यस्थिती

  • रेपो रेट : 4.00% VS 4.00%
  • रिवर्स रेपो रेट : 3.35% VS 3.35%

मागच्या बैठकीत देखील बदल नाही
याआधी तीन दिवसांच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (The monetary policy committee) बैठक RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. 5 फेब्रुवारी रोजी शेवटच्या बैठकीनंतर केंद्रीय बँकेने मुद्रास्फीतीच्या चिंतेचा उल्लेख करत मुख्य व्याजदरांमध्ये (रेपो) मध्ये कसल्याही प्रकारचा बदल केला नव्हता. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW Final : स्मृती मानधनाची विश्वविक्रमी खेळी! शफाली वर्मासोबत इतिहास घडवला; भारताच्या 'सुवर्ण'पदकाचा पाया भक्कम

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

SCROLL FOR NEXT