rbi esakal
अर्थविश्व

चलनवाढ रोखण्यातील अपयशाचा आरबीआय केंद्राला देणार अहवाल

देशातील चलनवाढ ठराविक मर्यादेपेक्षा कमी न झाल्याप्रकरणी रिझर्व बँकेतर्फे केंद्र सरकारला अहवाल दिला जाणार.

प्रशांत पाटील

देशातील चलनवाढ ठराविक मर्यादेपेक्षा कमी न झाल्याप्रकरणी रिझर्व बँकेतर्फे केंद्र सरकारला अहवाल दिला जाणार.

मुंबई - देशातील चलनवाढ ठराविक मर्यादेपेक्षा कमी न झाल्याप्रकरणी रिझर्व बँकेतर्फे केंद्र सरकारला अहवाल दिला जाणार आहे. बँकेच्या पतधोरण समितीच्या विशेष बैठकीत आज यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

मात्र या अहवालाचा तपशील आपण जाहीर करणार नाही, तो अधिकार केंद्र सरकारचा आहे, असे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

देशातील चलनवाढ गेले अनेक महिने सहा टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्याने कायद्यानुसार या संदर्भातील स्पष्टीकरण केंद्र सरकारला देणे रिझर्व बँकेला भाग आहे. त्याबाबतच्या पत्राचा मसुदा तयार करण्यासाठी आज सहा सदस्य पतधोरण समितीची बैठक दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शशांक भिडे, अशीमा गोयल, जयंत वर्मा, डेप्युटी गव्हर्नर मिखाइल पात्रा आणि राजीव रंजन आदी सदस्य यावेळी हजर होते.

सन २०१६ नंतर प्रथमच अशा प्रकारे केंद्र सरकारला स्पष्टीकरण देण्याची वेळ रिझर्व बँकेवर आली आहे. सप्टेंबर मध्ये चलनवाढीचा दर ७.१ टक्क्यांवर गेल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने ही विशेष बैठक घेतली.

चलनवाढ ठराविक मर्यादेत ठेवण्यास रिझर्व बँकेला अपयश आल्याचे दास यांनी बुधवारी मान्य केले होते. मात्र त्याचवेळी चलनवाढ रोखण्यासाठी व्याज दरवाढ करण्याच्या धोरणाचेही त्यांनी समर्थन केले. मात्र आधीपासूनच व्याजदर वाढवले असते तर कोरोनाचा फटका बसलेली देशाची अर्थव्यवस्था आणखीन कोलमडली असती, असेही ते म्हणाले. रशिया युक्रेन युद्धानंतर मे महिन्यापासून रिझर्व बँकेने व्याजदर वाढवणे सुरू केले आहे. रिझर्व बँकेची नियमित द्वैमासिक पतधोरण समितीची बैठक पाच ते सात डिसेंबर दरम्यान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indurikar Maharaj: नाद करता काय? इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ट्रोलर्सना दिलेलं चॅलेंज पूर्णच करणार?

IPL 2026 सुरू असताना अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, हे नव्या संघात दाखल; फ्रँचायझींचा डाव

LPG Supply Crisis India : एलपीजीबाबत मोठी अपडेट समोर ! नवीन कनेक्शन्स मिळणार की नाही? सरकारने नेमकं काय सांगितलं...

Jal Jeevan Mission: कोट्यवधींचा जलजीवन मिशन फेल; टाकळी-परिसरात पाणी असूनही ग्रामस्थ तहानलेले

Latest Marathi News Live Update: मालाड पूर्वेत दीराकडून वहिनीच्या घरात चोरी

SCROLL FOR NEXT