अर्थविश्व

RBL बँकेच्या शेअर्सवर मिळेल तगडा परतावा, ब्रोकरेज हाऊसेसकडून 'Buy' रेटींग

शिल्पा गुजर

येत्या काळात RBL बँकेच्या शेअर्समध्ये किमान 35% तेजी असा विश्वास ब्रोकरेज हाऊसना वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी RBL बँकेच्या शेअर्सवरील रेटींग अपग्रेड केले आहे.

RBL बँकेचे डिसेंबर तिमाहीचे (Q3FY22) निकाल एसेट क्‍वालिटी आणि व्याज इन्कमच्या (NII) बाबतीत अतिशय चांगले आले आहेत. मात्र, तरी शुक्रवारी RBL बँकेचे शेअर्स 3.6 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. बँकेने ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहीचे निकाल 27 जानेवारीला जाहीर केले. बँकेच्या नफ्यात वार्षिक आधारावर 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. निकालानंतर ब्रोकरेज हाऊस ब्रोकरेज हाऊस सीएलएसए आणि मोतीलाल ओसवाल यांनी आरबीएल बँकेच्या स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे.

ब्रोकरेज हाऊस काय म्हणतात ?

नेट इंटरेस्‍ट इनकम (NII) आणि मालमत्तेच्या क्‍वालिटीबाबतीत बँकेचे निकाल चांगले असल्याचे जागतिक ब्रोकरेज फर्म यांचे म्हणणे आहे. ब्रोकरेजने बँक शेअरचे रेटिंग 'बाय' वर अपग्रेड केले आहे. म्हणजेच हे शेअर्स खरेदी करायचा सल्ला दिला आणि टारगेट 200 रुपये केले आहे. तर क्रेडिट सुइसने बँकेचे 'अंडरपरफॉर्म' रेटिंग कायम ठेवले आहे.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने RBL बँकेच्या स्टॉकवर 200 रुपयांचे टारगेट देत खरेदीचा सल्ला कायम ठेवला आहे. गेल्या महिन्यात आरबीआयकडून व्यवस्थापनात बदल झाल्यानंतर बँकेची चिंता वाढली होती. असे असतानाही बँकेच्या महसुलात चांगली वाढ झाल्याचे मोतीलाल ओसवालचे म्हणणे आहे.

35% वाढ अपेक्षित

RBL बँकेचा स्टॉक 28 जानेवारी 2022 ला, 3.62 टक्क्यांनी कमी होऊन 147.60 रुपयांवर बंद झाला. म्हणजेच स्टॉक सध्याच्या किंमतीपेक्षा 35 टक्क्यांनी वाढू शकतो. यावर्षी आतापर्यंत या शेअरमध्ये सुमारे 12 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. मात्र, गेल्या वर्षभरात हा शेअर 35 टक्क्यांहून अधिक घसरला होता.

तिसऱ्या तिमाहीचे निकाल

डिसेंबर 2021 च्या तिमाहीत RBL बँकेचा निव्वळ नफा जवळपास 6 टक्क्यांनी वाढून 156 कोटी झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेला 147 कोटींचा नफा झाला होता. बँकेचे नेट इन्कम (NII) 11 टक्क्यांनी वाढून 1010 कोटी झाले, जे एका वर्षापूर्वी डिसेंबर तिमाहीत 908 कोटी होते. तर बँकेचा ऑपरेटिंग एक्‍सपेन्स 46 टक्क्यांनी वाढून 1,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत तो 683 कोटी होता. टेक्‍नोलॉजी, एम्‍प्‍लॉईज आणि कम्‍प्‍लायंस कॉस्‍टशिवाय बँकेने सप्टेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान 90 नवीन शाखा उघडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT