अर्थविश्व

अनिल अंबानींच्या 'आरकॉम'चा शेअर 10 टक्के तेजीत 

वृत्तसंस्था

सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर खडबडून जागे झालेल्या रिलायन्स कम्युनिकेशनने (आरकॉम) अखेर सोमवारी (ता. 18) इरिक्‍सन कंपनीची 462 कोटींची देणी चुकती केली. अंतिम मुदतीच्या एक दिवस आधीच इरिक्‍सनचे पैसे परत केल्याने रिलायन्स कम्युनिकेशनचे प्रमुख अनिल अंबानी यांचा तीन महिन्यांचा तुरुंगवास टळला आहे. परिणामी आज मुंबई शेअर बाजारात आरकॉमचा शेअर 10 टक्क्यांनी वधारला आहे. शेअर 4.40 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 

अनिल अंबानी यांचे थोरले बंधू मुकेश अंबानी यांनी पैसे भरले आहेत. रिलायन्स कम्युनिकेशनने तब्बल 18 महिन्यांपासून इरिक्‍सनचे 580 कोटी थकवले होते. थकबाकी वसुलीप्रकरणी इरिक्‍सनने सर्वोच्च न्यायालयात रिलायन्स कम्युनिकेशनविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने इरिक्‍सनची थकबाकी चार आठवड्यांत परत करा; अन्यथा तीन महिने तुरुंगात जा, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. पैसे परत करण्यासाठी अंबानी यांच्याकडे 19 मार्चपर्यंतची मुदत होती. मात्र, एक दिवस आधीच रिलायन्स कम्युनिकेशनने इरिक्‍सनचे पैसे परत केले आहेत. रिलायन्सने यापूर्वी 118 कोटी सर्वोच्च न्यायालयात जमा केले होते. तसेच, तीन कोटी रुपये दंडात्मक व्याजापोटी जमा केले. उर्वरित 458.77 कोटी सोमवारी इरिक्‍सनला देण्यात आले. याशिवाय, इरिक्‍सनला सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडूनही तीन कोटी मिळणार आहेत. 

अनिल अंबानी यांनी थोरले बंधू मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे आभार मानले आहेत. कौटुंबिक मूल्य जपताना कठीण प्रसंगी पाठबळ दिल्याबद्दल मी आदरणीय बंधू मुकेश आणि नीता यांचा आभारी असल्याची भावना अनिल अंबानी यांनी व्यक्त केली. इरिक्‍सनची देणी दिल्यानंतर रिलायन्स कम्युनिकेशनने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात अंबानी यांनी सर्वांचे आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT