IT Company Sakal
अर्थविश्व

IT Company : दिग्गज आयटी कंपन्यांमधील भरती ९७ टक्क्यांनी कमी

जगभरात मंदीचे सावट तीव्र होत असून, अनेक दिग्गज कंपन्या विशेषतः माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रातील कंपन्या हजारोंच्या संख्येने कर्मचारी कपात करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जगभरात मंदीचे सावट तीव्र होत असून, अनेक दिग्गज कंपन्या विशेषतः माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रातील कंपन्या हजारोंच्या संख्येने कर्मचारी कपात करत आहेत.

नवी दिल्ली - जगभरात मंदीचे सावट तीव्र होत असून, अनेक दिग्गज कंपन्या विशेषतः माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रातील कंपन्या हजारोंच्या संख्येने कर्मचारी कपात करत आहेत. त्या तुलनेत भारतात परिस्थिती चांगली असली, तरी आयटी कंपन्यांमध्ये होणाऱ्या भरतीचे प्रमाण घटले आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएल टेक या चार बड्या आयटी कंपन्यांनी मिळून डिसेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाहीत केवळ १९४० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. गेल्या ११ तिमाहींमधील ही सर्वांत कमी भरती आहे. जगभरातील वाढत्या आर्थिक अस्थिरतेमुळे आणि भू-राजकीय तणावामुळे तंत्रज्ञान सेवांची मागणी घटत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे नव्या कर्मचारी भरतीवर नकारात्मक परिणाम झाला आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएल टेक या देशातील चार मोठ्या आयटी कंपन्यांनी गेल्या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीअखेर एकूण ६१,१३७ कर्मचाऱ्यांची वाढ नोंदवली होती. कोविड-१९ साथीमुळे डिजिटायझेशनची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी या कंपन्यांमध्ये कर्मचारी भरतीत जोरदार स्पर्धा झाली होती.

गेल्या ११ तिमाहींमध्ये आघाडीच्या या चार आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी नियुक्ती वाढली होती, मात्र त्यानंतर आता त्यात केली जात असलेली घट, बदलत्या तंत्रज्ञानाचा कल दर्शविते, असे या क्षेत्रातील विशेषज्ञ कमल कारंथ यांनी म्हटले आहे.

डिसेंबर २०२२ च्या अखेरीस, टीसीएसची कर्मचारी संख्या २,१९७ ने कमी झाली, तर विप्रोमधून ४३५ कर्मचारी कमी झाले. या कालावधीत नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी झाले. त्यामुळे नवी कर्मचारी भरतीही कमी झाली. सुमारे सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही मंदी येत्या काही महिन्यांत आणखी वाढेल, असे कंपन्यांचे मत आहे. अनिश्चित भू-राजकीय परिस्थिती, येऊ घातलेली मंदी आणि कंपन्यांनी खर्चात कपात करण्यासाठी उचललेली पावले हे कर्मचारी भरती कमी करण्यामागचे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.

चार आयटी कंपन्यांमधील कर्मचारी भरती

  • डिसेंबर २०२२ तिमाहीतील भरती - १९४०

  • आर्थिक वर्ष २०२२ तिसरी तिमाही -६१,१३७

  • आर्थिक वर्ष २०२३ दुसरी तिमाही-२८,८३६

  • गेल्या ११ तिमाहींमधील सर्वांत कमी भरती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT