adhar. 
अर्थविश्व

मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करणं अगदी सोपं; अशी आहे प्रोसेस

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- आधार कार्डचा वापर संपूर्ण देशात केला जात आहे. आधारकार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. सरकारने अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांसोबत आधार कार्ड लिंक करण्यास सांगितलं आहे. पण, त्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधारकार्डसोबत लिंक असणे खूप महत्त्वाचं आहे. आधारकार्डसोबत मोबाईल क्रमांक लिंक नसल्यास तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात.  

धक्कादायक! कोविड लस घेतल्यानंतर हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयचा मृत्यू

तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक नसल्यास सोप्या पद्धतीने तुम्ही ते लिंक करु शकता. पण, यासाठी तुम्हाला आधारच्या एनरोलमेंट/अपडेट सेंटरला जावे लागेल. या प्रक्रियेसाठी जवळपास 90 दिवसांचा वेळ जाऊ शकतो. पुढील स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तुमचा नंबर रेजिस्टर करु शकता. 

-सर्वात आधी तुम्हाला आधार एनरोलमेंट/ अपडेट सेंटरला जावं लागेल

-त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड सुधारणा फॉर्म भरावा लागेल

-ज्या क्रमांकला आधारशी जोडायचा आहे, तो फॉर्ममध्ये भरा आणि जमा करा

-प्रमाणीकरणासाठी तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक्स द्यावे लागेल

-त्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल

-या पावतीमध्ये तुम्हाला एक रिक्वेस्ट नंबर (URN) मिलेल

-URN चा वापर करुन तुम्ही आपले अपडेशन स्टेटस चेक करु शकता

युपीत 'लव जिहाद' चा तमाशा; हिंदू - मुस्लिमांमध्ये दरी वाढविण्याचा...

-आधारमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवे आधारकार्ड घेण्याची गरज नाही

-जेव्हा मोबाईल क्रमांक आधारसोबत रजिस्टर होईल, त्यानंतर तुम्हाला आधारचे ओटीपी येणे सुरु होतील

-जर तुम्हाला आधारचे अपडेट स्टेटल पाहायचं असेल तर तुम्ही  UIDAI चा टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करुन जाणू शकता

-आधारकार्डशी मोबाईल क्रमांक रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला एनरोलमेंट/अपडेट केंद्रावर 25 रुपये द्यावे लागतील. मोबाईल क्रमांक रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला अन्य कोणतेही कागदपत्रे द्यावे लागणार नाहीत. फक्त तुम्हाला आधार अपडेट फॉर्म भरावा लागेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT