reliance ornaments
reliance ornaments sakal media
अर्थविश्व

रिलायन्स ज्वेल्सतर्फे 'बेला कलेक्शन' दागिने; नव्या डिझाइनला उत्तम प्रतिसाद

कृष्ण जोशी

मुंबई : रिलायन्स ज्वेल्सतर्फे (reliance jewellers), खासकरून आजच्या आधुनिक, स्वावलंबी आणि उत्साही स्त्रीयांसाठी (women's) बेला कलेक्शन (Bella collections) हे नव्या डिझाईनचे आकर्षक दागिने (New design ornaments) बाजारात आणले आहेत. प्रत्येक क्षणाचा आनंद घेणाऱया कणखर स्त्रीयांची अभिव्यक्ती दाखविण्यासाठी आणलेल्या 'बेला- मेक एव्हरी डे स्पेशल' या आगळ्यावेगळ्या नव्या डिझाइनच्या दागिन्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

हे दागिने जड आणि मोठे नसून रोजच्या वापरासाठीचे लहान, हलकेफुलके आणि आकर्षक दिसणारे आहेत. नाजुक डिझाईन आणि बारिक कलाकुसरीचे हे दागिने अगदी कौटुंबिक सोहळ्यात, शॉपिंगला जाताना, पार्टीसाठी, पिकनिकला असे केव्हाही परिधान केले तरीही ते शोभून दिसतात. रोज मेहनत करणाऱ्या आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेणाऱ्या स्त्रीयांच्या कणखरतेच्या आणि सौंदर्याचे प्रतीक असे हे दागिने आहेत. त्यांची किंमत पावणेसात हजार रुपयांपासून सुरु होते, असे रिलायन्स ज्वेल्सचे सीईओ सुनील नायक म्हणाले.

या दागिन्यांच्या प्रत्येक डिझाइनमध्ये नाजूकपणा आणि सृजनशीलतेचे पैलू दिसतात. ही ज्वेलरी अगदी माफक दरातही उपलब्ध असल्याने दागिन्यांची आवड असलेल्या स्त्रीयांनाही त्याबाबत समाधान वाटेल. या वर्षातील सणासुदीच्या निमित्ताने आणखीही वेगळ्या डिझाईनचे दागिने बाजारात आणू," असेही नायक म्हणाले.

भारतभरातील रिलायन्स ज्वेल्स शोरूममध्ये यातील सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर वीस टक्क्यांपर्यंत आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर वीस टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ घेता येऊ शकतो. या दुकानांना भेट देणाऱ्या सर्व पाहुण्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्वे आणि आरोग्यविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे, असेही ते म्हणाले. हे आकर्षक कलेक्शन देशभरातील रिलायन्स ज्वेल्सच्या शोरुम्समध्ये, शॉप-इन-शॉपमध्ये आणि https://www.reliancejewels.com या रिलायन्स ज्वेल्सच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या ब्रँडतर्फे शंभर टक्के बीआयएस हॉलमार्क असलेल्या सोन्याचे दागिने उपलब्ध करून देण्यात येतात. येथील दागिन्यांमध्ये जडविण्यात येणारा प्रत्येक हिरा हा मान्यताप्राप्त स्वतंत्र प्रयोगशाळांमार्फत प्रमाणित करण्यात आलेला असतो. या ब्रँडतर्फे प्रत्येक खरेदीवर लॉयल्टी पॉइंट्सही देण्यात येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : नरेश म्हस्केंच्या उमेदवारीमुळे भाजप नाराज? पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

SCROLL FOR NEXT