Renault 
अर्थविश्व

'ही' कंपनी करणार कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्क्यांची वाढ

पीटीआय

कोविड-१९ महामारीच्या संकटकाळात लॉकडाऊनचा विपरित परिणाम उद्योग आणि कर्मचाऱ्यांवर झाला आहे. अनेक कंपन्या कर्मचारी कपात किंवा वेतन कपात करताना दिसत आहेत. अशा वेळी ऑटोमोबाईल क्षेत्रातील फ्रेंच कंपनी, रेनॉ इंडियाने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. रेनॉ इंडिया आपल्या २५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्क्यांपर्यत वाढ करणार आहे. मागील वर्षी कंपनीने घवघवीत नफ्याची नोंद केली होती.

रेनॉ इंडिया कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याबरोबरच प्रमोशनसुद्धा देणार आहे. रेनॉ इंडिया प्रा लि. ३० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रमोशनसुद्धा देणार आहे. ही वेतनवाढ आणि प्रमोशन ऑगस्ट महिन्यापासून लागू होणार आहे.

ट्रायव्हर एमपीव्ही मॉडेलच्या यशामुळे रेनॉ इंडियामध्ये उत्साह आहे. यापुढे येऊ घातलेल्या उत्सवी सिझनमध्ये कंपनीच्या छोट्या एसयुव्ही मॉडेलच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता कंपनीला वाटते आहे. ही बाब लक्षात घेऊन कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह कायम ठेवू इच्छिते. त्यासाठीच कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि प्रमोशन करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. 

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर रेनॉ इंडिया १५ टक्के वेतनवाढ देते आहे. त्याउलट मागील आर्थिक वर्षात कंपनीने फक्त १० ते १२ टक्क्यांचीच वेतनवाढ कर्मचाऱ्यांना दिली होती.  अर्थात ही वेतनवाढ फक्त रेनॉ इंडिया प्रा. लि.च्या कर्मचाऱ्यांचीच होणार आहे. सह्योगी उत्पादन प्रकल्प निसान किंवा रेनॉच्या संशोधन आणि विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश नाही.

* रेनॉ इंडिया करणार कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्क्यांची वाढ
* कोरोनाच्या संकटात कंपनीने केली घोषणा
* मागील वर्षी कंपनीने वेतनात केली होती १२ टक्क्यांची वाढ
* वेतनवाढीबरोबर कर्मचाऱ्यांना प्रमोशनसुद्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT