RBI 
अर्थविश्व

खुषखबर! कर्ज‌ होणार‌ स्वस्त!!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 6 टक्क्यांवरून कमी होत 5.75 टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली  रिझर्व्ह बँकेने आज आपले द्विमाही पतधोरण जाहीर केले आहे.

रेपो दर म्हणजेच बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर लागणारा व्याज दर. यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज दरात घट होत असल्याने त्याचा फायदा बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. 

आता कर्जदर कमी झाल्याने गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.

जानेवारी 2019 पासून रिझर्व्ह बँकेकडून सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात करण्यात आली आहे. गेल्या दोन पतधोरणात आतापर्यंत रेपो दरात अर्ध्या टक्क्याची म्हणजेच 50 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली आहे. विकासाची मंदावलेली वाढ आणि एनबीएफसीमधील गैरव्यवहारांमुळे लिक्विडीटी घटल्याने रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपातीची शक्यता आधीपासून व्यक्त करण्यात येत होती.

रेपो दर म्हणजे काय? 
रेपो दर म्हणजे ज्या दराने बॅंका रिझर्व बॅंकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेतात तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बॅंकांना रिझर्व बॅंकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं;तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बॅंकेला स्वस्तात कर्ज मिळणं. म्हणजेच रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बॅंकांना ग्राहकांना द्यावयाच्या कर्जांचे दरही वाढवावे लागतात;तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? 
रिव्हर्स रेपो दर म्हणजे रेपो दराच्या अगदी उलट संकल्पना. बॅंका त्यांच्याकडील जास्तीचा निधी ठेवींच्या रूपात रिझर्व बॅंकेकडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बॅंक बॅंकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT