Reserve-Bank-of-India
Reserve-Bank-of-India 
अर्थविश्व

रिझर्व्ह बॅंक काय करतेय ?

पीटीआय

नवी दिल्ली - बॅंकिंग क्षेत्र बुडीत कर्जांनी संकटात सापडले असताना रिझर्व्ह बॅंक काय करतेय, असा सवाल ‘कॅग’चे प्रमुख राजीव मेहरीशी यांनी आज केला. 

बॅंकांमधील बुडीत कर्जांचा आकडा ९.६१ लाख कोटींवर गेला आहे. हे संकट कसे दूर करायचे, हा प्रश्‍न सरकारला भेडसावत असून, बॅंकांना भांडवली साह्य करणे त्रासदायक आहे. मात्र, बॅंकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज वितरण करताना रिझर्व्ह बॅंक काय करत होती, असा जाब कोणीही विचारत नाही. बुडीत कर्जांबाबत ‘आरबीआय’ची भूमिका काय, ‘आरबीआय’ची जबाबदारी कोणती, असा सवाल मेहरीशी यांनी उपस्थित केला. व्यवस्थापनामधील सुशासनाचा अभाव, आर्थिक गैरव्यवहार यांमुळेही बॅंकांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

बॅंकांनी नियमबाह्य कर्ज वितरण करताना नियंत्रक म्हणून रिझर्व्ह बॅंकेने कोणती भूमिका घेतली. बुडीत कर्जांबाबत रिझर्व्ह बॅंकेला जबाबदार धरावे का, यासंदर्भात सार्वजनिकरीत्या चर्चा होताना दिसत नाही.
- राजीव मेहरीशी, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीला तिसरा धक्का! आर अश्विनला मिळाली सामन्यातील दुसरी विकेट

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT