RBI
RBI  Sakal
अर्थविश्व

RBI News : खुशखबर! RBI ने घेतला मोठा निर्णय, आता 'या' देशांतील प्रवासी वापरू शकणार UPI

सकाळ डिजिटल टीम

Reserve Bank of India News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI च्या वापराबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

G-20 देशांतील प्रवाशांना भारतात राहताना मोबाइल-आधारित UPI वापरण्याची परवानगी देण्यासाठी एक परिपत्रक जारी करण्यात आले.

UPI हे एक पेमेंट प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर मोबाईल अॅपवर अनेक बँक खाती एकत्रित केली जाऊ शकतात.

UPI द्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यातून पैसे दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर आणि ऑर्डर करू शकता. भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांना आणि अनिवासी भारतीयांना ते वापरण्याची परवानगी आरबीआयने आधीच जाहीर केली होती.

RBI च्या वतीने सांगण्यात आले की, G-20 देशांतील प्रवाशांना निवडक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ही सुविधा सुरू होईल. यानंतर, ही सुविधा देशातील सर्व राज्यांत जारी केली जाईल.

भारताने 1 डिसेंबर 2022 रोजी G-20 चे अध्यक्षपद स्वीकारले. G-20 हा जगातील विकसित आणि विकसनशील देशांचा समूह आहे.

कोणत्या देशांचा समावेश :

यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे.

UPI द्वारे पेमेंट 13 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले :

आरबीआयने बुधवारी परदेशी नागरिक आणि अनिवासी भारतीयांना (एनआरआय) याचा वापर करण्याची परवानगी देण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा : वेळ सिमेंट आणि बँकांच्या शेअरमध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक करण्याची

UPI द्वारे पेमेंट जानेवारीमध्ये मासिक आधारावर 1.3 टक्क्यांनी वाढून सुमारे 13 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

SCROLL FOR NEXT