Money e sakal
अर्थविश्व

सर्वसामान्यांना फटका, आजपासून बदलणार 'या' गोष्टी

नामदेव कुंभार

मुंबई : बँकिंग आणि कराशी संबंधित नियमात आजपासून बदल होणार आहेत. याशिवाय मोटार आणि दुचाकी वाहनाच्या किमती देखील वाढणार आहे. एकुणातच आजपासून होणाऱ्या या बदलांचा सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.

आजपासून स्मॉल सेव्हिंग स्कीमचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. यात पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, एमआयएस, टाइम डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट स्कीमचा समावेश आहे. याशिवाय प्राप्तीकर अधिनियमाच्या सेक्शन-१९४ मध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार त्यानुसार ५० लाखांच्या वरील खरेदीवर ०.१० टक्के टीडीएस कापला जाणार आहे. प्राप्तीकर अधिनियमांचे २०६ एबी सेक्शन १ जुलैपासून लागू होणार आहे. यामुळे जर एखाद्या विक्रेत्याने दोन वर्ष प्राप्तीकर विवरणपत्र दाखल केले नाही तर त्याला ५ टक्के टीडीएस द्यावा लागेल. पूर्वी ०.१० टक्के टीडीएस होता. त्यात आता ५० टक्के वाढ करण्यात आली आहे.

आयडीबीआय बँकेच्या लॉकर शुल्कात बदल

चेक लीफ चार्ज, बचत खाते शुल्क आणि लॉकर शुल्कात बदल करण्यात आला आहे. सेमी अर्बन आणि ग्रामीण भागातील खातेधारक आता बँकेत फक्त ५ वेळाच पैसे जमा करू शकणार आहेत. पूर्वी ही सुविधा ७ -१० वेळा उपलब्ध होती. तसेच ग्राहकांना आता २० पानांचेच चेकबुक मोफत दिले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक चेकसाठी ५ रुपये द्यावे लागणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे महिन्याला सरासरी १० हजार रक्कम बॅलन्स असेल तर त्याला लॉकरवर सवलत दिली जाणार आहे. सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकेत विलीन झाल्याने आता या बँकेच्या ग्राहकांना नवा आयएफएससी कोड वापरावा लागणार आहे.

दागिन्याला युनिक ओळख

‘आधार’च्या धर्तीवर सोन्याच्या प्रत्येक दागिन्याची युनिक ओळख तयार केली जाणार आहे. दागिने हरवल्यास वा चोरी झाल्यास त्याची ओळख पटावी म्हणून प्रत्येक दागिन्याला युनिक ओळख (यूआईडी) दिली जाणार आहे.

लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज

शिकाऊ परवाना बनवण्यासाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर घरातूनच चाचणी दिली जाऊ शकणार आहे. चाचणीत पास झाल्यानंतर लर्निंग लायसन्स घरी पाठवून दिले जाणार आहे. कायम परवान्यासाठी मात्र ट्रॅकवर वाहन चालवून दाखवावे लागणार आहे. दरम्यान, मारुती आणि हीरोच्या गाड्यांच्या किमती वाढणार असून हीरोच्या दुचाकींच्या एक्स-शो रूम किमतीत तीन हजार रुपयांची वाढ होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT