अर्थविश्व

रुपयातील अवमूल्यनाने वाढवली चिंता

पीटीआय

मुंबई : भांडवली बाजारात तेजीची लाट असताना चलन बाजारात रुपयातील अवमूल्यनाने नजीकच्या काळात केंद्र सरकारची चिंता वाढण्याची शक्‍यता आहे. सोमवारी (ता.26) चलन बाजारात डॉलरसमोर रुपयात 36 पैशांचे अवमूल्यन झाले. त्याने नऊ महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच 72 चा स्तर ओलांडला. दिवसअखेर रुपया डॉलरसमोर 72.02 वर बंद झाला.

रुपयाचे अवमूल्यन वाढल्याने आयातीचा खर्च वाढण्याबरोबर वित्तीय शिस्तीला धोका पोचण्याची शक्‍यता आहे. जागतिक बाजारात तुर्कस्थानची लिरा, चीनी युआन आणि ऑस्ट्रेलियन डॉलरचे अवमूल्यन झाल्याचे पडसाद भारतीय चलनावर उमटले. अमेरिका आणि चीन यांनी व्यापारीसंघर्षावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्यामुळे डॉलरला पाठबळ मिळत असल्याचे जाणकारांनी सांगितले. सहा चलनांचा समावेश असलेल्या डॉलर इंडेक्‍समध्ये सोमवारी 0.31 टक्‍क्‍याची वाढ नोंदवण्यात आली.

परकी गुंतवणूकदारांनी पैस काढण्याचा सपाटा लावल्याने रुपयाला झळ बसली. सोमवारी परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारातून 752 कोटी काढून घेतले. रुपयाने नऊ महिन्यांचा तळ गाठला आहे. यापूर्वी रुपया 14 नोव्हेंबर 2018 रोजी 72.02 च्या स्तरावर बंद झाला होता. दिवसभरात रुपयाने 72.25 चा नीचांकी स्तराला स्पर्श केला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर गोळीबारचा थरार, तरूणाने स्वत:वरच गोळी झाडून घेतली

Beed News: दुष्काळी मातीत फुलला रेशमी स्वप्नांचा मळा; बीडचा पॅटर्न देशभर हिट; उत्तराखंड, झारखंड आणि कर्नाटकपर्यंत तुती रोपांचा पुरवठा

SCROLL FOR NEXT