Russia Ukraine war affects on expensive Home Tiles business raw material prices sakal
अर्थविश्व

सामान्यांसाठी घरे महागणार

रशिया - युक्रेन युद्धाचा परिणाम; कच्च्या मालाचे दर वाढले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील वाढता संघर्ष भारतातील गृहनिर्माण प्रकल्पाच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. हे युद्ध जगाला महागाईच्या वेढ्यात ढकलू शकते. या युद्धामुळे कच्चे तेल, सिमेंट आणि अन्य काही वस्तू महागणार आहेत. यादरम्यान गृहनिर्माण क्षेत्रातील क्रेडाईने सांगितले की, या युद्धामुळे सिमेंटसारख्या कच्च्या मालाच्या किमतीतील संभाव्य वाढीमुळे येत्या काही महिन्यात घरांचे दर आणखी वाढू शकतात.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवू लागले आहेत. भारतीय गृहनिर्माणवर काय परिणाम होऊ शकतात, याबद्दल बोलताना क्रेडाईचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोदिया यांनी म्हटले की, जागतिक दबाव वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत आणि शेअर बाजारातही घसरण होण्याची शक्यता आहे. पटोदिया पुढे म्हणाले की, कच्च्या तेलाचे दर मागील दोन महिन्यांपासून सतत बदलत आहेत, ज्याचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होऊ लागला आहे. त्याचा परिणाम आता भारतीय सिमेंट उत्पादकांवर होणार असून त्यांच्यावर कच्चा माल आणि ऊर्जा महागल्याने दबाव निर्माण होत आहे.

असोसिएशनच्या मते, सिमेंट उत्पादकांना हा बोझा पेलावा लागणार आहे. कारण त्यांचा ६० ते ६५ टक्के व्यवसाय प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारित आहे. त्याचा प्रभाव गृहनिर्माण व्यवसायावरही पडणार आहे. क्रेडाईचे अध्यक्ष पुढे म्हणाले की, बांधकाम साहित्यांच्या किमती २०-३० टक्क्यांनी वाढल्यामुळे विकसकांना प्रकल्पांच्या किमती वाढवण्यास भाग पाडले आहे. पटोदिया म्हणाले की, उद्योगाच्या पूर्वानुमानातून संकेत मिळतात की, येत्या तिमाहीत किमतींमध्ये अधिक वाढ होईल आणि सध्याचे संकट पाहता हा उसळी अनेक पट मोठी असू शकते.

टाईल्स व्यवसायावरही परिणाम

गुजरातच्या मोरबीमध्ये टाईल्सचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र त्यासाठी लागणारी कच्च्या मालाच्या स्वरूपातील माती युक्रेनमधून आणली जाते आणि त्यातून चमकणाऱ्या टाईल्सची निर्मिती होते; परंतु या व्यवसायावरही युद्धाचा परिणाम होणार आहे. युक्रेनच्या मातीच्या अनेक खाणी असून त्यातून जगभरात या मातीचा पुरवठा केला जातो. जगभरातून मागणी वाढल्याने या मातीची किंमत वाढली आहे. त्यामुळे छोट्या टाईल्स उत्पादकांऐवजी केवळ मोठे टाईल्स उत्पादक या मातीचा वापर करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashes 2025-26 Details: सुरू होतोय ऍशेस मालिकेचा रोमांचक थरार! भारतात कुठे आणि कसे पाहाणार सामने? जाणून घ्या सविस्तर

Jui Gadkari : जुई गडकरींच्या जीवावर बेतलेला क्षण! रॉयल पाल्म्समध्ये ऑडिशनच्या नावाखाली ‘चकवा’!

'कोण आहे तो शाहरुख खान?' 2050 पर्यंत सुपरस्टारला लोक विसरुन जातील, विवेक ओबरॉयचं वक्तव्य चर्चेत

Latest Marathi News Update LIVE : जामनेरच्या नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी बिनविरोध

आठवीतली ती अन् इंजिनिअरिंगला असलेला तो; खिडकी ठरली मध्यस्थी, घरच्यांना कळलं तेव्हा... वैशाली सामंतची लव्हस्टोरी माहितीये?

SCROLL FOR NEXT