IPO
IPO Sakal
अर्थविश्व

Share Market: रुस्तमजी ग्रुपच्या कीस्टोन रियल्टर्सचा IPO येण्याची शक्यता

शिल्पा गुजर

Share Market Update: रुस्तमजी ग्रुपची कंपनी कीस्टोन रियल्टर्सने Keystone Realtors सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे अर्थात सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. या आयपीओद्वारे सुमारे 850 कोटी रुपये उभारण्याची त्यांची योजना आहे. यात 700 कोटींचे नवीन शेअर्स आणि सध्याचे शेअरहोल्डर्स आणि प्रमोटर्सकडून 150 कोटी पर्यंतच्या ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे.

(Share Market Update)

कीस्टोन रिअलटर्स हे सर्वात मोठ्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक आहे. 31 मार्च 2022 पर्यंत कंपनीकडे रुस्तमजी ब्रँड अंतर्गत मुंबई एमएमआरमध्ये 32 पूर्ण झालेले प्रकल्प, 12 चालू प्रकल्प आणि 19 आगामी प्रकल्प आहेत. तर 31 मार्च 2022 पर्यंत कंपनीने 20.05 दशलक्ष चौरस फूट निवासी इमारती, प्रीमियम गेट इस्टेट, टाउनशिप, कॉर्पोरेट पार्क, रिटेल स्पेस, शाळा, आयकॉनिक लँडमार्क आणि इतर अनेक रिअल इस्टेट प्रकल्प विकसित केलेत.

आयपीओ ऑफर अंतर्गत, कंपनीचे प्रमोटर शेअरधारक बोमन रुस्तम इराणी 75 कोटींचे शेअर्स विकणार आहेत. त्याच वेळी, पारसी सोराजी चौधरी 37.50 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. चंद्रेश दिनेश मेहता 37.50 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत.

ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड (Axis Capital Limited) आणि क्रेडीट सुसी सिक्युरिटीज Credit Suisse Securities (India) या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर असतील. आयपीओमधून मिळणारी रक्कम कंपनी आणि तिच्या सहाय्यक कंपन्यांनी घेतलेली कर्ज फेडण्यासाठी, कंपनीच्या अधिग्रहण योजना आणि कंपनीच्या इतर कामकाजासाठी वापरली जाईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT