Sakal Money active financial adviser on the way of wealth creation 
अर्थविश्व

"सर्वांगीण गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवंय? 

सकाळ डिजिटल टीम

गुंतवणुकीच्या क्षेत्रात "मिस-सेलिंग' हा अत्यंत गंभीर प्रश्‍न असून, त्याला दररोज शेकडो नागरिक बळी पडत असल्याचे तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आले आहे. बड्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबतचा सल्ला देण्यासाठी खास सल्लागार असतात, पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांना योग्य सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार भेटेलच, असे नाही. म्हणूनच त्यांच्या बाबतीत "मिस-सेलिंग'च्या घटना जास्त प्रमाणात घडताना दिसतात. हीच बाब लक्षात घेऊन "सकाळ मनी'ने याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्याप्रमाणे आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी "हेल्थ चेक-अप' करून घेतो, त्याच धर्तीवर "वेल्थ चेक-अप' किंवा "पोर्टफोलिओ चेक-अप' करता येईल का, असा विचार करून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

'सकाळ मनी'कडून घेतल्या आयोजित करण्यात येणाऱ्या "वेल्थ चेक-अप' उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळातो आहे. वाढत्या मागणीमुळे येत्या शनिवारी (ता.11 जानेवारी) पुण्यात हा उपक्रम पुन्हा आयोजित केला जाणार आहे.

सामाजिक गरज लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतलेला असून, त्याअंतर्गत ‘सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर’ (सीएफपी) असलेली तज्ज्ञ मंडळी आर्थिक नियोजनाबद्दल; तसेच सर्वांगीण गुंतवणुकीबाबत वैयक्तिकरीत्या मार्गदर्शन करणार आहेत. अशा मार्गदर्शनासाठी ‘सीएफपीं’कडून एरवी किमान 5.10 हजार रुपयांपर्यंतचे सल्लाशुल्क आकारले जाते. पण, ‘सकाळ मनी’ने आयोजित केलेल्या या उपक्रमात सहभागी झाल्यास गुंतवणूकदारांना व्यक्तिगतरीत्या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

''सकाळ मनी'चा हा उपक्रम 11 जानेवारी रोजी (शनिवारी) सकाळी 10:30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत "सकाळ'च्या बुधवार पेठ कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहे. त्यात सहभागी होऊन तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळविण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी 7447450123 या दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ठेवावा. नावनोंदणी केलेल्यांना यात उपक्रमात सहभागी होता येईल. राज्याच्या इतर शहरांतही असाच उपक्रम आयोजित करण्याचा ‘सकाळ मनी’चा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT