state Bank of India  sakal
अर्थविश्व

स्टेट बँकेचा कोट्यावधी ग्राहकांना झटका! आजपासून होणार...

स्टेट बँकेकडून कर्ज घेतले असेल तर आता तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे

सकाळ डिजिटल टीम

देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे. तुम्ही स्टेट बँकेकडून कर्ज घेतले असेल तर आता तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे.

स्टेट बँकेने आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या कर्जाच्या किमतीत 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ सर्व कालावधीच्या व्याजदरांवर केली जात आहे. ग्राहकाला EMI वर जास्त व्याज द्यावे लागेल.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन व्याज दर 15 डिसेंबर 2022 पासून म्हणजेच गुरुवारपासून लागू झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात 35 बेसिस पॉईंट्सने वाढ केल्यानंतर बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. सध्या आरबीआयचा रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे.

SBI ने FD चे दारात वाढ :

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँकेनेही अलीकडेच त्यांचे एफडी व्याजदर वाढवले ​​आहेत. बँकेचे नवीन दर 13 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. बँक आपल्या सामान्य नागरिकांना 7 ते 45 दिवसांच्या FD वर 3.00 टक्के व्याजदर देत आहे.

त्याच वेळी, बँक 46 ते 179 दिवसांच्या FD वर 4.50 टक्के व्याजदर, 180 ते 210 दिवसांच्या FD वर 5.25 टक्के व्याजदर, 211 ते 1 वर्षाच्या FD वर 5.75 टक्के व्याजदर देत आहे. 2 ते 3 वर्षांच्या FD वर 6.75 टक्के व्याजदर, 3 ते 5 वर्षांच्या FD वर 6.25 टक्के व्याजदर व्याजदर देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT