SBI
SBI file photo
अर्थविश्व

SBIचा अलर्ट; व्यवहार ठप्प होऊ नये यासाठी...

वृत्तसंस्था

पॅनकार्ड आधारशी जोडण्यासाठी सरकारने जुलै २०१७मध्ये प्रथमच अंतिम मुदत निश्चित केली होती, पण त्यानंतर सरकारने अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही भारतीय स्टेट बँक (SBI)चे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयने आपल्या ४४ कोटी ग्राहकांना सतर्क केलं आहे. एसबीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट केले आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, ३० जूनपूर्वी ग्राहकांनी पॅन (PAN) आणि आधार कार्ड (Aadhaar) लिंक करून घ्यावे. अन्यथा बँक व्यवहारामध्ये समस्या उद्भवू शकतात. (SBI alert to customers to link their PAN-Aadhaar by June 30)

आधारला पॅनकार्डबरोबर जोडा

आधार आणि पॅनकार्ड जोडणे बंधनकारक असल्याचे एसबीआयने आपल्या ग्राहकांना ट्विटद्वारे सांगितले आहे. जर पॅन आणि आधार एकमेकांशी जोडले गेले नाही, तर पॅनकार्ड निष्क्रिय होईल आणि ग्राहकांना व्यवहारात अडचणी येतील. पॅनकार्ड आधारशी जोडण्याची शेवटची तारीख ३० जून आहे.

ट्वीटद्वारे ग्राहकांना माहिती देताना एसबीआयने म्हटले आहे की, 'आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांचे पॅनकार्ड आणि आधार जोडण्यासाठी सल्ला देत आहोत, जेणेकरुन बँकिंग सेवेत कोणताही अडथळा येऊ नये.'

महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्रालयाने म्हटले होते की, "करदात्यांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेत केंद्र सरकारने पॅनकार्ड आधारशी जोडण्याची अंतिम तारीख ३० जून २०२१ पर्यंत वाढविली आहे." पॅनकार्ड आधारशी जोडण्यासाठी सरकारने जुलै २०१७मध्ये प्रथमच अंतिम मुदत निश्चित केली होती, पण त्यानंतर सरकारने अनेकवेळा मुदतवाढ दिली आहे.

अर्थविश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT