SBI Main.jpg File photo
अर्थविश्व

एसबीआयचा खातेदारांना झटका, आता चार वेळेसच नि:शुल्क पैसे काढा

नामदेव कुंभार

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आता पैसे काढण्याच्या नियमात बदल करत खातेदारांना झटका दिला आहे. यानुसार स्टेट बँकेच्या खातेदारांना आता एका महिन्यांत केवळ चार वेळेसच मोफत पैसे काढण्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यापेक्षा अधिक वेळा व्यवहारावर शुल्क आकारणी केली जाणार आहे. नवीन नियम एक जुलैपासून लागू होणार आहेत.

एसबीआयकडून आता अतिरिक्त मूल्यवर्धित सेवेसाठी पंधरा ते ७५ रुपयांपर्यंत शुल्क आकारणी केली जाणार आहे. स्टेट बँकेच्या शाखा, एटीएम, सीडीएम (कॅश डिस्पेन्सिंग मशिन्स) वर होणारे बिगर वित्तिय व्यवहार आणि खात्यांतर्गत व्यवहार मोफत असतील.मात्र बॅकेची शाखा, एसबीआय एटीएम किंवा अन्य बँकेचे एटीएममधून एका महिन्यात केवळ चार वेळेसच नि:शुल्क पैसे काढता येथील. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी पंधरा रुपये आणि जीएसटी आकारला जाईल.

एटीएम आणि शाखेतून एकूण चारपेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास शुल्क वसूल केले जाईल. तसेच चेकबुक सेवेसाठी एका वर्षासाठी पहिले दहा चेक हे मोफत दिले जातील. त्यानंतरच्या दहा चेकसाठी ४० रुपये, २५ चेकसाठी ७५ रुपयांचे शुल्क वसूल केले जाईल. तसेच अतिरिक्त जीएसटी आकारणी होईल. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकच्या जादा शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.

एसबीआयच्या नियमात असे बदल

एका महिन्यात चारवेळेस नि:शुल्क पैसे काढता येणार

नवीन नियम एक जुलैपासून लागू होणार

अतिरिक्त चेकबुक घेण्यावरही जादा शुल्क आकारणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : ठेकेदार कंपनीचा १८ कोटींचा दंड थकीत विनापरवानगी नदीत खोदाई; एकाचा बळी गेल्यानंतर कारवाईला वेग

Indrayani River Pollution : ‘इंद्रायणी’वर पुन्हा एकदा विषारी फेसाची चादर ; प्रशासकीय निष्क्रियतेमुळे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

अळीवाचे लाडू कधी खाल्लेत का? पाहा ही झटपट रेसिपी; Aliv Ladoo Recipe

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Bijwadi Rain Shortage : उत्तर माणमधील बिजवडी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत; खरीपानंतर रब्बी हंगामही धोक्यात

SCROLL FOR NEXT