Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा...

Breaking Marathi News Updates 08 August 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

स्कूलबसच्या चाकाखाली आल्याने चिमुकलीचा मृत्यू, अमरावती जिल्ह्यातील घटना, पालक आक्रमक

रिद्धपूर येथील बाजार चौकात स्कूलबसमधून उतरून घरी जात असताना पाच वर्षीय चिमुकली विद्यार्थिनी स्कूलबसच्या समोरच्या चाकाखाली आल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (ता. ८) दुपारी १२ वाजता घडली. या घटनेनंतर स्कूलबसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ईश्वरी रवी ठाकरे (वय ५), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती चांदूरबाजार येथील आनंद प्रायमरी स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com