State bank of India 
अर्थविश्व

‘एसबीआय’कडून मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - नोटबंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर बँकांमध्ये जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि बॅंकेतील खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. परिणामी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

एसबीआयने एक वर्ष ते 455 दिवसांसाठी मुदत ठेवीवरील व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी करून 6.90 टक्के करण्यात आला आहे. याआधी तो 7.05 टक्के होता. त्याचप्रमाणे 456 दिवस ते दोनवर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवरील व्याजदर 7.10 टक्क्यांवरून कमी करून तो आता 6.95 टक्के केला आहे. तसेच दोन वर्ष ते तीन वर्षादरम्यानच्या मुदत ठेवीवर 6.85 टक्के दराने व्याज मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

Latest Marathi News Live Update : मुंबई-नाशिक महामार्गावर ५ ते ६ किमी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

SCROLL FOR NEXT