state Bank of India  sakal
अर्थविश्व

SBI News : SBI च्या ग्राहकांना मोठा झटका, बँकेने बदलला 'हा' नियम, आता खात्यातून आपोआप कापले जाणार पैसे!

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

State Bank Of India Latest News : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुमचेही या सरकारी बँकेत खाते असेल आणि तुमच्या खात्यातून कोणतेही व्यवहार न करता आपोआप पैसे कापले जात असतील तर बँक तुमच्या खात्यातून पैसे का कापत आहेत? जाणून घ्या.

खात्यातून 147.50 रुपये कापले जात आहेत :

सध्या अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे आपोआप कापले जात असल्याचे चित्र आहे. यासोबतच 147.50 रुपयांच्या कपातीचा मेसेज येत आहे. अशा परिस्थितीत हा मेसेज पाहून अनेक ग्राहकांनी बँकेत तक्रारी दाखल केल्या आहेत.

बँक दरवर्षी खात्यातून पैसे कापते :

बँकेच्या बाजूने याबाबत माहिती देताना एसबीआयकडून ग्राहकांच्या खात्यातून हे पैसे डेबिट करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. बँक हे पैसे मेंटेनन्स चार्ज म्हणून घेत आहे. हे पैसे बँकेतून वर्षातून एकदाच घेतले जातात. बँकेने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हे पैसे बँकेकडून शुल्क म्हणून कापले जातात. त्याच वेळी, बँकेने जारी केलेल्या डेबिट कार्डसाठी, ग्राहकांकडून वार्षिक 125 रुपये वसूल केले जातात. 18 टक्के दराने जीएसटी जोडला जातो, त्यानंतर ही रक्कम 147.50 रुपये होते.

कार्ड बदलूनही पैसे भरावे लागतात :

याशिवाय जर कोणत्याही ग्राहकाला त्याचे डेबिट कार्ड बदलायचे असेल तर त्यासाठी त्याला जीएसटी शुल्कासह बँकेला 300 रुपये भरावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT