state Bank of India  सकाळ
अर्थविश्व

SBI Recruitment 2022 : SBI मध्ये 'या' श्रेणीतील उमेदवार भरू शकतील विनामूल्य अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पदांवर रिक्त जागा आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही पदांवर रिक्त जागा आहेत. यासाठी अधिकृत भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत, SBI मध्ये 54 पदे भरायची आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 डिसेंबर 2022 आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

हेही वाचा : Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

रिक्त जागांचा तपशील :

SBI भर्ती 2022 अंतर्गत एकूण 54 पदांची नियुक्ती केली जाईल. या भरती प्रक्रियेअंतर्गत नियमित आणि कंत्राटी अशी दोन्ही पदे भरली जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

SBI मध्ये या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 29 डिसेंबर 2022 पर्यंत वेळ आहे.

अर्ज शुल्क :

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 750 रुपये भरावे लागतील. तर, SC, SC, PWD श्रेणीतील उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

असा करा अर्ज :

  • उमेदवारांनी प्रथम SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in/web/careers वर जा

  • त्यानंतर होमपेजवरील रिक्रूटमेंट टॅबवर क्लिक करा.

  • त्यानंतर 'ऑनलाइन अर्ज करा' या लिंकवर क्लिक करा.

  • मग तुमची नोंदणी करा आणि अर्ज भरा.

  • त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.

  • आता तुमचा अर्ज सबमिट करा.

  • यानंतर, उमेदवारांच्या फॉर्मची प्रिंट काढा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Talaq-e-Hasan Case: मुस्लिमांमध्ये तलाक-ए-हसन म्हणजे काय? ऐकून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही संतापले, नेमकं प्रकरण काय?

Pune News : पुण्यात मनमानी खोदाईला ब्रेक! नियम मोडणाऱ्या ठेकेदाराचे काम मनपाने थांबवले; आधी रस्ते दुरुस्त करा, मगच पुढचे काम

Shubman Gill: अनफिट शुभमनला खेळवणार का? गुवाहाटी कसोटीसाठी भारतीय संघासमोर निवडीचा पेचप्रसंग

Latest Marathi News Update LIVE : : सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये थंडीची लाट तापमान 9 अंश सेल्सिअस

Leopard Attack:'पती-पत्नीवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला'; कोपरगाव तालुक्यातील दाेघे गंभीर जखमी, अंगावर काटा आणणारा थरार !

SCROLL FOR NEXT