अर्थविश्व

स्टेट बॅंकेच्या कर्जदरात कपात 

वृत्तसंस्था

 नवी दिल्ली ः रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात 0.35 टक्क्याची कपात केली आहे.  त्यानंतर त्याचा फायदा सामान्यांपर्यंत पोचवण्याचे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी केले होते. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने देखील कर्जाच्या दरात 15 बेसिस पॉईंट्स अर्थात 0.15 टक्क्याची कपात केली आहे.  एसबीआयने एमसीएलआरच्या दरात  0.15 टक्क्यांची कपात केली होती. बँकेचा एका वर्षासाठीचा एमसीएलआर दर 8.40 टक्क्यांवरून कमी करत 8.25 टक्के करण्यात आला आहे. चालू वर्षात 10 एप्रिलपासून आतापर्यंत बँकेने गृह कर्जाच्या दरात 0.35 टक्क्याची कपात केली आहे. 

 सुधारित व्याजदर 10 ऑगस्टपासून  लागू करण्यात येणार आहे. यामुळे नवीन गृहकर्ज आणि वाहन कर्ज काहीसे स्वस्त होईल. शिवाय मासिक हप्ता कमी होणार असून बॅंकांमधील लाखो कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. पतधोरणानंतर लगेच "एसबीआय'ने व्याजदर कमी केल्याने इतर बॅंकांकडून व्याजदर आढावा घेऊन "एसबीआय'चे अनुकरण केले जाण्याची शक्‍यता आहे.  दरम्यान व्याजदरांमधील बदलांचा फायदा मिळवण्यासाठी कर्जदारांनी एमसीएलआर व्याजदरांचा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन गेल्या काही महिन्यांपासून एसबीआयकडून करण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली T20I मालिका; झिम्बाब्वेचा दुसर्‍या सामन्यात उडवला धुव्वा

संपूर्ण भाजप धर्मेंद्र प्रधानांच्या पाठिशी! शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

विषय चांगला पण.. कसा आहे श्रेयस तळपदे अन् काजल अग्रवालचा 'द इंडिया स्टोरी'? वाचा रिव्ह्यू

Sharad Pawar on NEET Protest : नीट आंदोलनाच्या तोडग्यासाठी माझा सल्ला महत्त्वाचा ठरला, असा शरद पवारांचा दावा

Pune Student Protest Celebration : शिक्षणमंत्र्यांच्या कथित राजीनाम्याच्या दाव्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांचा जल्लोष; ‘मेलोडी’ वाटून साजरा केला आनंदोत्सव

SCROLL FOR NEXT