SEBI  sakal
अर्थविश्व

SEBI Ban News : 8 कंपन्यांवर सेबीने घातली 7 वर्षांची बंदी; ठोठावला 11.5 कोटी रुपयांचा दंड

भांडवली बाजार नियामक सेबीने सिक्युरिटी मार्केटमधून 8 कंपन्यांवर पुढील सात वर्षांसाठी बंदी घातली आहे.

सकाळ डिजिटल टीम

SEBI Ban News: भांडवली बाजार नियामक सेबीने सिक्युरिटी मार्केटमधून 8 कंपन्यांवर पुढील सात वर्षांसाठी बंदी घातली आहे. या कंपन्यांमध्ये BRH Wealth Kreators आणि BRH Commodities यांचाही समावेश आहे.

याशिवाय या कंपन्यांना 11.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेशही सेबीने दिले आहेत. या कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांच्या निधीचा गैरवापर केला आहे. या प्रकरणांतर्गत सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने दंड आणि बंदी घातली आहे.

सेबीने बीआरएच वेल्थ क्रिएटर्स आणि बीआरएच कमोडिटीजवर 5-5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय या दोन्ही कंपन्यांचे संचालक अनुभव भट्टर यांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

SEBI ने पुढील 7 वर्षांसाठी सिक्युरिटी मार्केटमधून या तीन संस्थांवर बंदी घातली आहे.

हेही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

याशिवाय Prosperous Vyapaar, Polo-Setco Tie Up, Parton Commercial, AB Investments आणि Bluesnow Supplies यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मात्र, भांडवली बाजार नियामक सेबीने या पाच संस्थांवर रोखे बाजारातून 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे.

सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, बीआरएच वेल्थ क्रिएटर्स आणि बीआरएच कमोडिटीजने नियमांचे उल्लंघन केले आहे. या कंपन्यांनी ग्राहकांच्या निधी आणि रोख्यांचा गैरवापर केला आणि निधी 5 संबंधित संस्थांकडे वळवला.

SEBI ला त्यांच्या तपासणीत आढळून आले की, या संस्थांनी PFUTP (Prohibition of Fraudulent and Unfair Trade Practices) च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच, BRH वेल्थ क्रिएटर्स आणि BRH कमोडिटीजने SCRA नियमांचे उल्लंघन केले आहे.

सेबीने पैसे परत करण्याचे दिले आदेश :

याशिवाय सेबीने आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की, बीआरएच वेल्थ क्रिएटर्स, बीआरएच कमोडिटीज आणि भट्टर यांना पैसे परत करण्यास सांगितले आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये, अंतरिम आदेशाद्वारे, विविध संस्थांवर बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT