sebi sebi
अर्थविश्व

SEBI ने केले महत्त्वाचे बदल; गुंतवणुकदारांसाठी नवीन नियम

सध्या न्यू फंड ऑफरमध्ये (NFO) जमा करण्यात येणाऱ्या रकमेतही सेबीने बदल केले आहेत.

प्रमोद सरवळे

नवी दिल्ली: Securities Exchange Board of India: देशातील बाजार नियंत्रक सेबीने (SEBI) मंगळवारी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये स्वतंत्र संचालकांशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करणे आणि अधिकृत गुंतवणूकदारांना नियमांची चौकट लागू करण्यासह अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. दुसऱ्या प्रस्तावात, नियामकांनी निवासी भारतीय फंड व्यवस्थापकांना परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा भाग बनण्याची परवानगी दिली आहे. यासोबतच म्युच्युअल फंडाच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत एसेट मॅनेजमेंट कंपन्यांना अशा योजनांशी संबंधित जोखीमच्या आधारे योजनेत किमान रक्कम गुंतवावी लागेल.

सध्या न्यू फंड ऑफरमध्ये (NFO) जमा करण्यात येणाऱ्या रकमेतही सेबीने बदल केले आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीत सेबी मंडळाने हे निर्णय घेतले. सेबीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिकृत गुंतवणूकदार हे आर्थिक निकषांवर अवलंबून व्यक्ती, HUFs, कौटुंबिक विश्वस्त, एकमेव मालक, भागीदारी कंपन्या, विश्वस्त व कॉर्पोरेट असू शकतात.

सेबीने Prohibition of Insider Trading Regulations, 2015 मधील दुरुस्त्याही मंजूर केल्या. ज्यात माहिती देणाऱ्यांना जास्तीत जास्त बक्षीस सध्याच्या 1 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपये करण्यात आले आहे. याशिवाय इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट ट्रस्ट्स (InVITs) आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REITs) च्या नियमात बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : ठेकेदार कंपनीचा १८ कोटींचा दंड थकीत विनापरवानगी नदीत खोदाई; एकाचा बळी गेल्यानंतर कारवाईला वेग

Indrayani River Pollution : ‘इंद्रायणी’वर पुन्हा एकदा विषारी फेसाची चादर ; प्रशासकीय निष्क्रियतेमुळे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

अळीवाचे लाडू कधी खाल्लेत का? पाहा ही झटपट रेसिपी; Aliv Ladoo Recipe

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Bijwadi Rain Shortage : उत्तर माणमधील बिजवडी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत; खरीपानंतर रब्बी हंगामही धोक्यात

SCROLL FOR NEXT