अर्थविश्व

विकास दर 5.7 टक्‍क्‍यांपर्यंत घसरणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: मागणीतील घट, रोडावलेली गुंतवणूक आणि सेवा क्षेत्राच्या सुमार कामगिरीने विकासाचा वेग मंदावणार आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत विकास दर 5.7 टक्‍क्‍यांपर्यंत घसरेल, असा नवा अंदाज नोमुरा या संस्थेने व्यक्त केला आहे. नोमुराच्या विकासदराच्या अंदाजाने गुंतवणूकदार धास्तावले असून त्याचे पडसाद बुधवारी (ता. 21) भांडवली बाजारावर उमटले. 

चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते जून) भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 5.7 टक्‍क्‍यांपर्यंत खाली येईल, असे नोमुराने अहवालात म्हटले आहे; मात्र जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, असे संस्थेने म्हटले आहे. 2018-19 या वर्षात विकासदर 6.8 टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित राहिला. 2014-15 नंतर विकासदराची निराशाजनक कामगिरी ठरली. अर्थव्यवस्थेतील बहुतांश क्षेत्रांमध्ये मंदीसदृश स्थिती आहे. यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांमधील नकारात्मक वातावरण आहे. मागणीमध्ये प्रचंड घट झाली आहे. त्याशिवाय गुंतवणूक आटली आहे. रुपयातील अवमूल्यन, व्यापारी संघर्ष यासारख्या बाह्य घटकांचाही अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे नोमुराने म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT