ओमानजवळ व्यापारी जहाजावर हल्ला! अमेरिकेविरोधात संतप्त भारताचा मोठा निर्णय; US राजदूतांना निषेधपत्र जारी

India Issues Demarche To US: ओमानच्या किनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला. निषेध नोंदवण्यासाठी अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांना बोलावून घेतले आहे.
India Issues Demarche To US

India Issues Demarche To US

ESakal

Updated on

भारत सरकारने बुधवार, १० जून रोजी ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. भारत सरकारने अमेरिकी राजदूताला निषेधपत्र जारी केले आहे. भारताचे हे पाऊल अमेरिकेला दिलेला एक स्पष्ट संदेश आणि मोठे पाऊल मानले जात आहे. जहाजावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांना बोलावले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com