sensex sakal
अर्थविश्व

निफ्टी 18,100 पार, गुंतवणूकदारांची संपत्ती 5 दिवसात 6 लाख कोटींवर

बुधवारी सेन्सेक्समध्ये जवळपास 400 अंकांनी वाढ झाली.

ओमकार वाबळे

भारतीय शेअर मार्केटमध्ये मागील दोन आठवड्यांपासूल 'बुल रन' सुरू आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हींचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर आहेत. या आठवड्यातही सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजीचे चित्र आहे. आज सेन्सेक्स 60,750 च्या वर असून निफ्टी 18,200 पर्यंत वधारला आहे. हे यंदाच्या मोसमातील उच्चांक आहेत.

बुधवारी सेन्सेक्समध्ये जवळपास 400 अंकांनी वाढ झाली. या वाढीसह सेन्सेक्स 60,750 च्या आसपास आहे. दुसरीकडे, निफ्टी सुमारे 150 अंकांच्या वाढीसह 18,200 च्या जवळ आहे. आज, बुधवारी बाजारात तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.44 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5 दिवसात 6 लाख कोटींपेक्षा जास्त वाढ झाली आहे. शेअर बाजारातील सततच्या 'बुल रन'मुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलात पाच सत्रांमध्ये 7,54,057.31 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये बीएसई-लिस्टिंग कंपन्यांचे बाजार भांडवल 7,54,057.31 कोटी रुपयांनी वाढून 2,69,74,604.36 कोटी रुपये झाले.

सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी उंचीवर

बीएसईचा 30-शेअरचा सेन्सेक्स मंगळवारी 0.25टक्क्यांनी वाढून 60,284.31 वर पोहोचला होता. सेन्सेक्सने चार दिवसांत 1,094.58 अंकांची उसळी घेतली आहे. परकीय गुंतवणूकदार (FPIs) भांडवली बाजारात निव्वळ विक्रेते होते. कारण त्यांनी मंगळवारी 278.32 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

Land Deal Probe: निवडणुकीनंतर महिनाभरात कोट्यवधींची जमीन खरेदी? देवदत्त निकम यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : आक्रमक राजकारणाला काहीही स्थान नाही - शायना एनसी

SCROLL FOR NEXT