Sensex nifty ends flat after gaining in morning session
Sensex nifty ends flat after gaining in morning session esakal
अर्थविश्व

उसळी घेतलेलं शेअर मार्केट पुन्हा झालं 'रेड'

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : आज शुक्रवारी सकाळी भारतीय शेअर मार्केटमध्ये साकारात्मक चित्र दिसत होते. आशियाई मार्केट घसरणीनंतर सावरत होते. त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवरही सकाळी दिसत होता. सकाळी १० च्या सुमारास बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंज ( BSE ) जवळपास ५७९ अंकांनी वर होते. मार्केट ५७, ८५६ पर्यंत पोहचले होते. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ( NSE Nifty) १५३ अंकांनी वर गेले होते. त्यात ०.८९ टक्क्यांचा सुधार झाला होता. ते १७, २६३ वर पोहचले होते. मात्र दुपारपर्यंत हा ट्रेंड बदलत गेला आणि मार्केट पुन्हा 'रेड' झाले.

बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 शुक्रवारी एक टक्क्यांहून अधिक वाढले. BSE सेन्सेक्स 57,750 च्या आसपास होता, तर निफ्टी 50 निर्देशांक 17,300 च्या वर होता. एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा (एमएंड), इंडसइंड बँक, विप्रो, टाटा स्टील, सन फार्मा, टेक महिंद्रा, आरआयएल हे बीएसई सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढले.

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी), एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल या 30 शेअर्सच्या निर्देशांकांचे नुकसान झाले. निफ्टी रियल्टी, निफ्टी आयटी, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 1-2% च्या श्रेणीत वाढल्याने सर्व निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत होते.

मात्र जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसे बँक आणि ऑटोमोबाईल स्टॉक्समध्ये मोठ्याप्रमाणावर विक्री सुरू झाली. त्यामुळे बीएसई आणि एनएसई देखील लाल रंगात गेले. दुपारी ३.४५ वाजेपर्यंत सेन्सेक्स ५७,२००.२३ पर्यंत खाली आला होता. तर निफ्टी १७,१०१.९५ पर्यंत खाली आले होते. सेन्सेक्स ७६.७१ तर निफ्टी ८.२० अंकांनी खाली आले होते.

आज बीएसईमध्ये मारूती, टेकमहिंद्रा, पॉवर ग्रीड, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि एसबीआय हे टॉप लूजर ठरले. त्यांच्या शेअर्समध्ये जवळपास २.९९ टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. तर एनटीपीसी, सन फार्मा, इंडसन बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, विप्रो, आयटीसी आणि भारती एअरटेल हे टॉप गेनर ठरले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी कोंडी; पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

SCROLL FOR NEXT