share market
share market sakal media
अर्थविश्व

सेन्सेक्स 60 हजारांवर; निफ्टीही 18 हजारांच्या आवाक्यात

कृष्ण जोशी

मुंबई : सेन्सेक्सने (Sensex) आपली घोडदौड कायम ठेवतानाच आज साठ हजारांचा स्वप्नवत वाटणारा टप्पा पार केला. त्यामुळे आज गुंतवणुकदारांच्या (investors) एकूण मालमत्तेचे मूल्य 261 लाखकोटी रुपये झाले. काल साठ हजारांपासून हाकेच्या अंतरावर आलेल्या सेन्सेक्सने आज बाजार उघडल्यावर काही वेळातच 60,322 वर झेप घेतली. त्यानंतरही त्याने तीन वेळा 60,300 च्या पुढे मजल मारली व 60,333 चा सर्वकालिक उच्चांकही नोंदवला. दिवसअखेर तो 163.11 अंशांची वाढ दाखवीत 60,048.47 अंशांवर बंद झाला. निफ्टीनेही (nifty) 30.25 अंश वाढून 17,853.20 अंशांचा बंद दाखविला. निफ्टीही आज अठरा हजारांच्या जवळ म्हणजे 17,947.65 पर्यंत गेला होता.

आज जागतिक शेअरबाजार नरमगरम होते तरीही भारतीय शेअरबाजारांनी वाढ दाखवली. आज मध्यम व छोट्या शेअरमध्ये नफावसुली झाली. सेन्सेक्सला एक हजार अंशांपासून ते 60 हजार अंशांपर्यंत जाण्यास 31 वर्षे लागली. गेल्या आठ महिन्यांत म्हणजे जानेवारीपासून सेन्सेक्स दहा हजार अंश वाढला. या कालावधीत गुंतवणुकदार 65 लाखकोटी रुपयांनी श्रीमंत झाले. बीएसई वरील सर्व शेअरचे मूल्य 196 लाखकोटी रुपयांवरून 261 लाखकोटी रुपयांपर्यंत गेले. सेन्सेक्सला 50 हजारांपासून 60 हजारांपर्यंत जाण्यास व्यवहाराचे केवळ 166 दिवस लागले. तर निफ्टीनेही जानेवारीपासून 3,300 अंशांची वाढ दाखवली.

गेले काही महिने तेजी दाखविणाऱ्या धातूनिर्मिती क्षेत्राच्या शेअरची आजही पडझड झाली. टक्केवारीच्या हिशोबात टाटा स्टील सर्वात जास्त म्हणजे सुमारे पावणेचार टक्के (47 रु.) पडून 1,271 रुपयांवर स्थिरावला. आयटीसी 238 रुपयांपर्यंत तर हिंदुस्थान युनिलीव्हर 2,741 रुपयांपर्यंत घसरला. स्टेटबँक, अॅक्सीस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, डॉ. रेड्डीज लॅब या शेअरचे भाव आज पडले. तर दुसरीकडे एशियन पेंट 123 रुपयांनी वाढून 3,443 रुपयांवर गेला. महिंद्र आणि महिंद्र ( बंद भाव 779 रु. ), एचसीएल टेक, एचडीएफसी बँक (1,601), एअरटेल (739), मारुती (6,950), इन्फोसिस (1,763) यांचेही भाव वाढले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - 46,240 रु.

चांदी - 59,620 रु.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT