Share Market Update sakal
अर्थविश्व

Share Market Closing : सेन्सेक्स-निफ्टी ऐतिहासिक तेजीत, आयटी शेअर्समध्ये वाढ

सलग सहाव्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार नवीन उच्चांकावर बंद झाला

सकाळ डिजिटल टीम

Share Market Closing : सलग आठव्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार नवीन उच्चांकावर बंद झाला. सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स 63,284 अंकांवर तर निफ्टी 18867 अंकांवर पोहोचला होता. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 184 अंकांच्या वाढीसह 63,284 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 54 अंकांच्या उसळीसह 18,812 अंकांवर बंद झाला.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे...

सध्या टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये तेजी आहे. फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी येत्या बैठकीमध्ये व्याजदरांबाबत भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर अमेरिकन बाजारात तेजी आली.

आजचे टॉप शेअर्स

आजच्या व्यवहारात समभागांमध्ये संमिश्र कल दिसून आला. सेन्सेक्सचडे 15 समभाग तेजीत बंद झाले. आज टॉप गेनर्समध्ये TATASTEEL, TCS, TECHM, WIPRO, INFY, HCLTECH, LT यांचा समावेश आहे, तर ICICI बँक, M&M, कोटक बँक, HUL, Titan, मारुती यांनी घसरण दर्शविली आहे.

जागतिक बाजारात तेजी

चांगल्या जागतिक संकेतांदरम्यान, आज देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसून आली. बुधवारी रुपया 42 पैशांनी मजबूत होऊन अमेरिकन चलनाच्या तुलनेत डॉलर 81.30 या दोन आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांक 0.27 टक्क्यांनी घसरून 105.66 वर आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT