sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात तेजी; निफ्टी 18 हजार पार

शेअर बाजारात 1858 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली. निफ्टी पुन्हा एकदा 18 हजार अंकांवर गेला आहे. एप्रिल महिन्यात निफ्टीने 18 हजारांचा टप्पा गाठला होता. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स 455 अंकांच्या तेजीसह स्थिरावला तर निफ्टीमध्ये 133 अंकांची तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये आज 0.76 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,571 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.75 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,070 अंकांवर स्थिरावला आहे.

आज शेअर बाजारात 1858 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1634 कंपन्यांचे दर घसरले. आज शेअर मार्केटमध्ये आयटी, रिअल इस्टेट, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टर वगळता इतर सर्व सेक्टरमधील शेअर दरात तेजी दिसून आली आहे. बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, ग्राहकोपयोगी वस्तूच्या शेअर दरात तेजी दिसून आली आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्समध्येही तेजी दिसून आली आहे.

आज पहिल्या सत्रात सेन्सेक्स 331 अंकांच्या तेजीत असून निफ्टी 110 अंकांवर व्यवहार करत होता. तर सेन्सेक्समध्ये आज 0.61 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,479 अंकांवर सुरू झाला आहे. तर निफ्टीमध्ये 0.63 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,049 अंकांवर सुरू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; खात्यात पोहोचले हजारो कोटी

आनंदाची बातमी! पुण्यात १३ लाखांत मिळणार घर, म्हाडाकडून ४४६२ घरांसाठी लॉटरी जाहीर

Pune Crime: विमा योजना संपली, पैसे मिळणार सांगून गंडा; वाघोलीतील व्यक्तीला ४० लाखांचा ऑनलाइन चुना

Ujani Water: उजनीचे पाणी वाया, बोराळे नंदूरचे तलाव कोरडे! शेतकऱ्यांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा संताप, कार्यालयात ठिय्या

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

SCROLL FOR NEXT