Share Market Latest Updates | Stock Market News  sakal
अर्थविश्व

'फेड'च्या निर्णयाचा Share Market ला फटका, Sensex 1045 अंकानी घसरला

सेन्सेक्स 1045 अंकानी घसरुन 51,495 वर बंद झाला

सकाळ डिजिटल टीम

फेडरल रिजर्व्हकडून मोठी व्याजदरवाढ झाल्याने शेअर बाजारात चिंतेचे वातावरण आहे. व्याजदरवाढीची अपेक्षा या आधीच असल्याने सोमवारपासूनच शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू होते. आज शेअर बाजारात सुरवातीच्या सत्रापासून अस्थिरता दिसून आली. अखेर शेवटी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 1045 अंकानी घसरुन 51,495 वर बंद झाला तर निफ्टीतही 330 अंकाची घसरण होत 15.360 वर बंद झाला. (share market closing update 16 june 2022)

आज सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स 600 अंकाच्या घसरणीसह 53, 141 वर सुरू झाला तर निफ्टी 155 अंकाच्या घसरणीसह 15,848 वर सुरू झाला. त्यानंतर थोड्याच वेळात शेअर बाजारात तेजी दिसून आली. मात्र फेडरल रिजर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ झाल्याने आज बाजारात अस्थिरता दिसून आली. (share market opening update 16 june 2022)

यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.75 टक्के वाढ जाहीर केली आहे. 28 वर्षांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिकेतील महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे कठोर पाऊल यूएस फेडरल बँकने उचलले आहे. अमेरीकेत महागाई दर हा 40 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहे. मे महिन्यात हा महागाई दर 8.6 टक्के नोंदवला गेला. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या या सेंट्रल बँकेने यावर तोडगा म्हणून व्याजदरात वाढ केली आहे.

0.75 टक्क्यांनी झालेली ही व्याजवाढ ही 1994 नंतरची सर्वाधिक वाढ आहे. सध्या यूएस फेडच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे भारतीय चलनावर त्याचा मोठा परिणाम दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT