Share Market Closing  sakal media
अर्थविश्व

Share Market Closing : बाजार सावरला, अंबानींच्या 'या' शेअरमध्ये मोठी तेजी

आज शेअर बाजारात 37 शेअर्समध्ये तेजी तर 13 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Closing : गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली होती. या आठवड्याच्या सुरवातीलाही शेअर बाजारात घसरण दिसून आली. सोमवारी बाजार घसरला मात्र आज मंगळवारी शेअर बाजार तेजीसह दिसून आला.

आज बाजारात सेन्सेक्स 562 अंकाच्या तेजीसह 60,655 वर बंद झाला तर निफ्टी 1ं58 अंकाच्या तेजीसह 18,053 वर बंद झाला. आज शेअर बाजारात 37 शेअर्समध्ये तेजी तर 13 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. (share market closing update 17 January 2022)

आज सुरवातीच्या शेअर बाजारात सेन्सेक्स 0.82 अंकाच्या तेजीसह 60,142 सुरू झाला तर निफ्टी 27.95 अंकाच्या तेजीसह17,922.80 वर सुरू झाला.

सोमवारी बाजार चढ-उतारानंतर बाजार घसरणीवर बंद झाला. सेन्सेक्स 168 अंकांनी घसरून 60,093 वर बंद झाला होता. दुसरीकडे, निफ्टी 62 अंकांनी घसरून 17895 च्या पातळीवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स घसरले होते.

मेटल, ऑटो, इन्फ्रा शेअर्समध्ये विक्री झाली, तर रिअल्टी, फार्मा शेअर्सवर सर्वाधिक दबाव दिसून आला. सरकारी बँकांशी संबंधित शेअर्समध्ये खरेदी झाली, तर आयटी, एनर्जी इंडेक्स वाढीसह बंद झाले होते.

आज कोणत्या शेअर्समध्ये तेजी

HINDUNILVR, HDFC, HCLTECH, TCS, RELIANCE, BRITANNIA, MARUTI, CIPLA

आज कोणत्या शेअर्समध्ये घसरण

SBILIFE, COALINDIA, BAJFINANCE, TATASTEEL, WIPRO, INDUSINDBK

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT