Share Market esakal
अर्थविश्व

Share Market: बाजार स्थिरावला; मात्र दिवाळीमध्ये गुंतवूणकदारांचे कोट्यावधींचे नुकसान

अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजार हलक्या तेजीसह बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार हलक्या तेजीत होता त्यानंतर दिवसभर शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण होते. अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजार हलक्या तेजीसह बंद झाला.

सेन्सेक्स 133 अंकाच्या तेजीसह 59,307 वर बंद झाला तर निफ्टी 20.85 अंकाच्या तेजीसह 17,584 वर बंद झाला. शेवटचा दिवस असल्याने शेअर बाजाराकडे सर्वांचे लक्ष मात्र गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा आली.

आज तब्बल २९ शेअर्स खाली गेले तर २१ शेअर्समध्ये हलकी तेजी दिसून आली. TATAMOTORS, CIPLA, TATASTEEL, TCS, COALINDIA, RELIANCE सारख्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.

सध्या सणावारांचा काळ असल्याने आणि सोबतच वीकेंड आल्याने शेअर बाजार बंद राहणार त्यामुळे आजचा दिवस हा निर्णायक होता. मात्र अपेक्षेप्रमाणे आजचा दिवस फार काही कमाल करू शकला नाही.

आज सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स 151 अंकाच्या तेजीसह 59,354 वर सुरू झाला होता तर निफ्टी 48 अंकाच्या तेजीसह 17,612 वर सुरू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT