stock market closed  
अर्थविश्व

Share Market: मोठ्या अस्थिरतेनंतर शेअर बाजार सावरला, Sensex 257 तर Nifty 86 अंकांनी वाढला

गेले दोन दिवस बाजारात सुरू असलेल्या चढउताराला ब्रेक लागला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. सुरुवातीला शेअर बाजारमध्ये घसरण झाल्यानंतर बाजार बंद होताना मात्र तो काहीसा सावरल्याचं चित्र आहे. सेन्सेक्समध्ये आज 257 अंकांची वाढ होऊन तो 59,031 अंकावर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 86 अंकांची वाढ होऊन तो 17,577 अंकावर स्थिरावला.

गेले दोन दिवस बाजारात सुरू असलेल्या चढउताराला ब्रेक लागला आहे. आज सकाळी पहिल्या सत्रात शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली होती. मात्र, काही वेळानंतर बाजार सावरण्यास सुरुवात झाली. सेन्सेक्स निर्देशांकात 567 अंकांची घसरण होऊन बाजार खुला झाला होता.

शेअर बाजार सुरु झाल्यानंतर झालेल्या पडझडीनंतर काही वेळाने बाजार सावरण्यास सुरुवात झाली. सेन्सेक्स 567 अंकांच्या घसरणीसह 58,205 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 133.35 अंकांच्या घसरणीसह 17,357.35 अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. त्यानंतर पुन्हा घसरण सुरू झाली. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 10 अंकांनी वधारत 58,784.46 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 2.75 अंकांनी वधारत 17,493.45 अंकांवर व्यवहार करत होता.

आज शेअर बाजारात ऑटो , बँक, कॅपिटल गुड्स, मेटल, फार्मा, ऑईल अॅन्ड गॅस आणि रिअॅलिटीमध्ये आज खरेदी झाल्याचं दिसून आलं. तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांवर आज काहीसा दबाव असल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 0.5 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT