Todays Share Market Updates sakal
अर्थविश्व

Share Marketमध्ये तेजी,आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना दिलासा

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही शेअर बाजार तेजीत दिसला

सकाळ डिजिटल टीम

गेला आठवडाभर शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळाला. गुरुवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली तर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही शेअर बाजार तेजीत दिसला आणि अखेर शेवटच्या सत्रातही शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 460 अंकाच्या तेजीसह 52,720 वर बंद झाला तर निफ्टी142 अंकाच्या तेजीसह 15,700 वर बंद झाला. (share market update)

आज शेअर बाजारात 41 कंपन्यांंचे शेअर्स तेजीत होते तर 9 कंपन्याचे शेअर्स घसरले. WIPRO, COALINDIA, HCLTECH आणि TCS सारख्या 9 कंपन्याच्या शेअर्स मध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली. (share market closing update 24 june 2022)

आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह उघडला होता. सेन्सेक्स 530 अंकाच्या तेजीसह 52,804 वर सुरू झाला तर निफ्टी 165 अंकाच्या तेजीसह 15,722 वर सुरू झाला.

गुरुवारी शेअर बाजार हिरव्या रंगात अर्थात वाढीसह बंद झाला होता. सेन्सेक्स 443.19 अंकांच्या म्हणजेच 0.86 टक्क्यांच्या वाढीसह 52,265.72 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 143.35 अंकांच्या म्हणजेच 0.93 टक्क्यांच्या वाढीसह 15556.65 वर बंद झाला डेली RSI पॉझिटीव्ह डायव्हर्जन दाखवत आहे, जे येत्या काळात बाजारासाठी चांगले संकेत आहे

अदानी ग्रुपच्या 'या' शेअरचा 20 वर्षात 22000% परतावा

अलीकडच्या काळात अदानी एंटरप्रायझेसचे (Adani Enterprises) शेअर्स दबावाखाली आहेत पण लाँग टर्मचा विचार केल्यास या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये सुमारे 221 पट वाढ झाली आहे आणि हा शेअर 9.41 रुपयांवरून 2082.10 रुपयांपर्यंत वाढला आहे. याचा अर्थ असा की गेल्या 20 वर्षांत या शेअरने सुमारे 22,000 टक्के परतावा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

SCROLL FOR NEXT