Todays Share Market News
Todays Share Market News google
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात दिवसभरात पडझड; सेन्सेक्स 861 तर निफ्टी 246 अंकांनी आपटला

सकाळ डिजिटल टीम

आज शेअर बाजारात मोठी पडझड झाली. शेअर बाजारात आजही अस्थिरता कायम दिसून आली. शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 861 अंकांनी घसरला. तर निफ्टी 246 अंकांनी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये आज 1.46 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,972 अंकांवर वधारला. तर निफ्टीमध्ये आज 1.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,312 अंकावर घसरला आहे. त्याचबरोबर आज आयटी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.

बाजारातील व्यवहार सुरू होताच शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला. आज बाजारात सुरुवातीला शेअर बाजाराचा निर्देकांक सेन्सेक्स 1,057 अंकांच्या घसरणीसह 57,776 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 310 अंकांच्या घसरणीसह 17,248 अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजार काही प्रमाणात सावरल्याचे चित्र होते.

शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली तसेच परकीय चलन बाजाराच्या आकडेवारीनुसार बाजार उघडताच रुपयाने घसरण दाखवण्यास सुरुवात केली. डॉलरच्या तुलनेत रुपया खालच्या स्तरावर घसरला आहे. ऐतिहासिक घसरणीसह रुपया 80 रुपये पार करून 80.11 पैशांवर घसरला आहे.

शुक्रवारी डॉलरचा भाव 79.87 पैसे होता. आज बाजार उघडताच डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 80.11 रुपयांवर पोहचला आहे. शुक्रवारच्या तुलनेत 21 पैशांची घसरण नोंदवली गेली आहे. रुपयाची डॉलरच्या तुलनेत कमालीची घरसण झाली आहे.

आज मुकेश अंबानी यांनी 5 G दिवाळीमध्ये रिलायन्स जिओ 5जी इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू होणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी नुकतीच केली आहे. या घोषणेमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएमवर आरआयएलच्या गुंतवणूकदारांसोबतच कॉर्पोरेट जगताच्याही नजरा खिळल्या आहेत.

येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेअर मार्केट आणि जागतिक बाजारपेठेत यामुळे काही बदल होऊ शकतात. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात शेअर मार्केटवर सर्वांच लक्ष्य लागून राहण्याची शक्यता आहे.

आज एकूण 1414 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली असून 1989 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तर 205 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. तर आज Tech Mahindra, Infosys, Wipro, HCL Technologies आणि TCS या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे. तर Britannia Industries, Maruti Suzuki, Apollo Hospitals, Nestle India आणि Asian Paints या कंपन्यांच्या निफ्टीध्ये वाढ झाली आहे. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT