share market sensex sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार सावरला! सेन्सेक्स 574 तर निफ्टी 177 अंकांनी वधारला

आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक वधारले.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेली घसरण आज थांबली. आज एक आठवड्यानंतर शेअर बाजार हिरव्या चिन्हात बंद झाला. चांगल्या सुरुवातीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखले. आज दिवसअखेर सेन्सेक्स 574.35 अंकांनी अर्थात 1.02 टक्क्यांनी वधारून 57037.50 वर बंद झाला. तर निफ्टी 177.90 अंकांनी अर्थात 1.05 टक्क्यांनी वधारून 17,136.55 वर बंद झाला. निफ्टी 50 मधील 38 शेअर्समध्ये आज वाढ झाल्याचं दिसून आलं, तर 12 शेअर्समध्ये घट झाली. भारत पेट्रोलियम (BPCL), टाटा मोटर्स (TATAMOTORS), श्री सिमेंट (SHREECEMENT) हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले, तर आयसीआयसीआय बँक(ICICI), बजाज फायनान्स (BAJAJFINANCE), BAJAJ FINSERVE, तसेच JSWSTEEL हे टॉप लुजर्स ठरले.

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली, पण शेवटच्या तासात चित्तर बदलले. मिड आणि स्मॉल कॅप शेअर्सवर विक्रीचे वर्चस्व दिसले. आज म्हणजेच बुधवारी विकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी दिवशी शेअर बाजाराने सकारात्मक ओपनिंग दिले. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आजच्या दिवसाच्या सुरुवातील वधारले. सेन्सेक्स 278.28 अंकांनी वधारून 56,741.43वर सुरु झाला तर निफ्टी 86.6अंकांनी वधारून 17,045.25सुरु झाला. निफ्टी 50 मधील 37 शेअर्समध्ये दिवसाच्या सुरुवातील घट झाली, तर केवळ 13 शेअर्समध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं.

मंगळवारी निफ्टी 17000 च्या खाली बंद झाला. सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार घसरणीवर बंद झाला. ऑईल अँड गॅस वगळता बीएसईच्या सर्व सेक्टर इंडेक्समध्ये विक्री झाली. आयटी, एफएमसीजी, रियल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. ऑटो, फार्मा, पॉवर शेअर्समध्ये प्रॉफीट बुकींग दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT