Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market : आज कोणते शेअर्स तुम्हाला देतील तगडी कमाई?

आज बाजाराची वाटचाल कशी असेल ?

शिल्पा गुजर

सोमवारी अर्थात 28 फेब्रुवारीला शेअर बाजार (Share Market) सलग दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगात अर्थात तेजीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स (Sensex) 388.76 अंकांच्या म्हणजेच 0.70 टक्क्यांच्या वाढीसह 56,247.28 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 135.50 अंकांच्या म्हणजेच 0.81 टक्क्यांच्या वाढीसह 16,793.90 वर बंद झाला.

रशिया आणि युक्रेनमधील वाढता संघर्ष आणि जागतिक शक्तींनी रशियावर लादलेल्या निर्बंधांचा पाश्चात्य देशांच्या बाजारपेठेवर परिणाम दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. आशिया बाजारातून मिळालेले चांगले संकेत आणि मेटल शेअर्समधील खरेदीमुळे बाजारातील उत्साह सोमवारी वाढल्याचे दिसून आले.

दोन मार्च अर्थात आज बाजाराची वाटचाल कशी असेल ?

टेक्निकल निफ्टीने एक लॉन्ग ग्रीन कँडल तयार केली आहे आणि लोअर बोलिंज बँड फॉर्मेशनच्यावर थांबल्याचे दिसत असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे सचिन गुप्ता म्हणाले. पण तरीही ते 200-दिवसांच्या SMA खाली ट्रेड करत आहे. आवर्ली चार्टवर, निफ्टी 21-SMA च्या वर घसरला आहे जे पुढील रिकव्हरीचे लक्षण आहे. निफ्टीला 16,650-16,500 वर सपोर्ट दिसत आहे. वरच्या बाजूला 17,000 वर रझिस्टंस आहे. दुसरीकडे, बँक निफ्टीला 35,500 वर सपोर्ट आणि 36,800 वर रझिस्टंस दिसत आहे.

16,800 ची पातळी आधी निफ्टीसाठी महत्त्वाचा सपोर्ट म्हणून काम करत होती, पण आता त्याची भूमिका बदलली आहे आणि निफ्टीसाठी तो एक रझिस्टंस बनल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. जोपर्यंत निफ्टी क्लोजिंग बेसिसवर 16800 च्या वर बंद होत नाही. तोपर्यंत निफ्टी कमजोर राहील. दुसरीकडे, जर निफ्टी 16,800 च्या वर बंद झाला, तर त्यात 17,200 ची पातळी पाहू शकतो असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

- हिन्दाल्को (HINDALCO)

- टाटा स्टील (TATA STEEL)

- पॉवर ग्रीड (POWERGRID)

- जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

- भारत पेट्रोलियम (BPCL)

- पेट्रोनेट (PETRONET)

- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)

- ट्रेंट (TRENT)

- भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

- बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT