share and stock market
share and stock market Sakal
अर्थविश्व

आज युक्रेन रशिया वादाचा परिणाम Share Market वर होणार का?

शिल्पा गुजर

आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात अस्थिरता होती.

आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली. निफ्टी (Nifty) 17 हजार 250 च्या खाली बंद झाला. त्याच वेळी, बँक निफ्टी हिरव्या चिन्हात अर्थात तेजीसह बंद झाला आहे. सेन्सेक्स निफ्टी सलग चौथ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. मिड आणि स्मॉल कॅपमध्ये विक्री दिसून येते आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात अस्थिरता होती.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स (Sensex) 149.38 अंकांनी म्हणजेच 0.26 टक्क्यांनी घसरून 57,683.59 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 69.60 अंक म्हणजेच 0.40 टक्क्यांच्या घसरणीसह 17,206.70 वर बंद झाला. बँकिंग वगळता सर्व क्षेत्रातील निर्देशांकांची विक्री झाली. ऑइल-गॅस, पॉवर आणि रियल्टी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एफएमसीजी, फार्मा शेअर्सवर दबाव राहिला. सुरुवातीच्या तेजीनंतर ऑटो, आयटी शेअर्समध्ये नफावसूली झाली. निफ्टीच्या 50 पैकी 37 शेअर्सची विक्री झाली. त्याचवेळी सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर्स घसरले. तर निफ्टी बँकेचे 12 पैकी 7 शेअर्स वधारले.

आज बाजाराची वाटचाल कशी होईल ?

आवर्ली चार्टवर इंडेक्स लोअर हायज आणि लोअर लोज फॉर्मेशनसह व्यापार करत असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे पलक कोठारी म्हणाले. जे येत्या ट्रेडिंग सत्रांमध्ये बाजारातील कमजोरीचे लक्षण आहे. याशिवाय निर्देशांक बोलिंजर मीडियन बँडच्या खाली ट्रेड करताना दिसत आहे. जे काउंटरमधील कमकुवतपणाचे लक्षण आहे.

सध्या 17000 च्या आसपास निफ्टीला सपोर्ट आहे, ज्याच्या खाली गेल्यास 16,900-16,800 पर्यंत खाली जाऊ शकतो. दुसरीकडे, निफ्टीसाठी 17,500 वर रझिस्टांस दिसून येत आहे. दुसरीकडे, बँक निफ्टीला 36,800 वर सपोर्ट आणि 38,500 वर रझिस्टांस दिसत आहे. निफ्टीने डेली चार्टवर लाँग लेग डोजी फॉर्मेशन तयार केले आहे जे बुल्स आणि बेअर्समधील अनिश्चितता दर्शवते असे कोटक सिक्युरिटीला श्रीकांत चौहान म्हणाले. निफ्टीला 17,250-17,300 वर त्वरित रझिस्टांस आहे. निफ्टीने वरच्या दिशेने ही पातळी तोडली तर 17375 ची पातळी त्यात दिसू शकते. दुसरीकडे, जर निफ्टी 17100 च्या खाली घसरला तर ही कमजोरी 17,050-17,000 पर्यंत दिसून येईल.

आजचे टॉप 10 शेअर्स ?

- विप्रो (WIPRO)

- इन्फोसिस (INFY)

- श्री सिमेंट (SHREECEM)

- पॉवर ग्रीड (POWERGRID)

- एचडीएफसी बँक (HDFCBANK)

- श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

- झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

- पेट्रोनेट (PETRONET)

- अशोक लेलँड (ASHOKLEY)

- भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Bomb Threat : सरकारी रुग्णालयांनंतर दिल्लीतील विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

MS Dhoni CSK vs RR : चेपॉकवर धोनीची सामन्यानंतर फटकेबाजी; चाहत्यांनी स्टेडियम घेतलं डोक्यावर

Covid subvariant: चिंता वाढली! राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 'इतके' रुग्ण आढळले, पुण्यात 51 तर ठाण्यात 20

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

Team India Racism : भारतीय क्रिकेट संघात होतोय वंशभेद..? वर्ल्डकप विजेत्या संघातील माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT